आम आदमी पार्टीच्या मागणीला यश….

0
560

आम आदमी पार्टीच्या मागणीला यश….

सोलार बोरिंग चे उर्वरित काम सुरू….- अमित बोरकर

 

 

घूग्घुस येथील शिव नगर इथे मागील कित्येक वर्षांपासून पाण्याची कमतरता होती. या बाबी लक्षात घेता आम आदमी पार्टी घूग्घुस द्वारा नगरपरिषद घूग्घुस इथे सप्टेंबर 2021 मध्ये 03 सोलार बोरींग बनविण्याकरिता निवेदन देण्यात आले परंतु याकडे नगरपरिषद प्रशासन व वेकोलि द्वारा दुर्लक्ष करण्यात आले याची दखल घेत 11/04/2022 रोजी नगरपरिषद कार्यालय समोर वेकोली व नगरपरिषद विरोधात साखळी उपोषण करण्याचा इशारा देताच नगरपरिषद द्वारा आश्वासन देण्यात आले व 02 सोलार बोरिंग बनविण्यात आल्या. परंतु उर्वरित सोलार बोरिंग चे काम अजूनही सुरू झालेले नसल्यामुळे ऑगस्ट 2022 मध्ये नगरपरिषद मुख्याधिकारी व पाणीपुरवठा अधिकारी यांच्याशी भेट देत तत्काळ बोरिंगचे काम सुरू करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा आप शहर अध्यक्ष अमित बोरकर यांनी दिला.

याची दखल घेत नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना शिवनगर येथील उर्वरित बोरिंग चे काम तत्काळ सुरू करण्याचे आदेश दिले व आज दिनांक 8 सप्टेंबर 2022 रोजी काम सुरू झाले. घूग्घुस गावातील शिवनगर हे प्रथम वार्ड बनला जिथे 24 तास पाण्याची सुविधा उपलब्ध झाली. यावर शिवनगर वासियांनी आम आदमी पार्टी घूग्घुस चे आभार व्यक्त केले.

शहर अध्यक्ष अमित बोरकर, उपाध्यक्ष अभिषेक सपडी, सचिव संदीप पथाडे, सहसचिव विकास खाडे, सह संघटनमंत्री आशिष पाझारे, रवी शांतलावार, प्रशांत सेनानी, प्रफुल पाझारे, निखिल कामतवार, अनुप धणविजय, अनुप नळे, करण बिऱ्हाडे, संतोष सलामे, प्रशांत पाझारे, कुलदीप पाटील, महिला शहर अध्यक्ष उमा तोकलवार, महिला उपाध्यक्ष सोनम शेख, महिला सचिव विपश्यना धनविजय, महिला कोषाध्यक्ष अंजली नगराळे, महिला संघटनमंत्री पुनम वर्मा, रिना पेरपूल्ला, शामला तराला, धम्मदिना नायडू, नईमा शेख, कविता विष्णु भक्त, शोभाताई इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here