महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकरी, गरीब कुटूंब यांचे झालेली नुकसान भरपाईची मदत त्वरित दिली जाईल…

0
460

महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकरी, गरीब कुटूंब यांचे झालेली नुकसान भरपाईची मदत त्वरित दिली जाईल…

मुख्यमंत्र्यांचे जनता दलाच्या शिष्टमंडळास आश्वासन

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

 

 

मुंबई दि २० : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जनता दलातर्फे राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्गाला नुकसान भरपाई देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या मागणीचा विचार करून ज्या ज्या जिल्ह्यात नुकसान भरपाई झाली आहे. तेथे सर्वांना मदत दिली जाईल असे आश्वासन दिले आहे.

गेले काही दिवस महाराष्ट्रात मुसळधार पाऊस चालू आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर अतिवृष्टी होऊन राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे, फळझाडे, जनावरे यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. व अनेक गरीब कुटुंबांचे घरे या पाऊसात पडून अनेक कुटुंब बेघर झाली आहेत. तरी प्रत्येक शेतकरी व गरीब कुटूंबाचे झालेले नुकसान लक्षात घेता त्यांना नुकसान भरपाई मिळावी. अशी मागणी महाराष्ट्र जनता दल (सेक्युलर) पक्षाच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आले. त्याची पुर्तता करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रभारी प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांना दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here