जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांचा वंचितांच्या समस्या सोडविण्याच्या आशावाद

0
394

जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांचा वंचितांच्या समस्या सोडविण्याच्या आशावाद

गोंडपिपरीत पार पडला जनता दरबार

 

गोंडपिपरी/प्रतिनिधी, 20 सप्टें. : काल गोंडपिपरीत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील जनतेचा जनता दरबार पार पडला. यावेळी तालुकाध्यक्ष डॉ. प्रकाश तोहोगावकर उपस्थित होते.

तालुक्यातील दुरदूर गावातील जनता या जनता दरबाराला आवर्जून उपस्थित होती. या दरबारात फुसे यांनी जनतेच्या समस्या ऐकून घेत त्या निकाली काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. उपस्थितांनी आपल्या समस्या फुसे यांना सांगितल्या. यावर सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली.

वंचित घटकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी जिल्हाध्यक्ष भूषण फुसे गाव खेड्यात जाऊन जनतेच्या समस्या जाणून घेत असून त्यासाठी प्रयत्नही करत आहेत. जनतेलाही आशावाद असल्याने वंचित, समस्याग्रस्त नागरिक आपल्या समस्या निदर्शनास आणून देत त्या सोडविण्यासाठी फुसे सकारात्मक प्रयत्न करत आहेत. या जनता दरबारात मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here