गृहिणींनी पत्राद्वारे मोदींसमोर मांडल्या व्यथा

0
424

गृहिणींनी पत्राद्वारे मोदींसमोर मांडल्या व्यथा

आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतृत्वात ‘लेटर टू पीएमओ‘ आंदोलन

 

 

चंद्रपूर : कोरोनामुळे मागील दोन वर्ष मोठ्या प्रमाणात नागरिकांना संकटाला सामोरे जावे लागले होते. अनेकांची आर्थिक स्थिती अद्यापही ठीक झाली नाही. तरी देखील महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यासोबतच महिलांना स्वयंपाक घरात उपयोगी पडणारे डाळ, कणिक, दुग्धजन्य पदार्थ यांच्या वर केंद्र सरकारने ५% जी.एस.टी. वाढवली आहे. त्याविरोधात महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांच्या निर्देशानुसार वरोरा तालुका महिला काँग्रेस कमिटी ग्रामीण व शहर च्या वतीने ‘लेटर टू पीएमओ‘ हे आंदोलन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतृवात संपन्न करण्यात आले.

गृहिणींना स्वयंपाक घरात उपयोगी पडणारे डाळ, कणिक, दुग्धजन्य पदार्थ तसेच इतर वस्तूंवर केंद्र सरकारने ५% जी.एस.टी. वाढवली त्या विरोधात महिला काँग्रेस कडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवण्यात येत आहे. या पत्रात आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या २०१४ पासून केंद्रात असलेल्या सरकार वर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. तेव्हापासूनच सर्वसामान्य व्यक्तीचे जनजीवन उध्वस्त व्हायला सुरुवात झाली. “बोहोत हुयी मेहंगाई की मार अबकी बार मोदी सरकार“, असा नारा देऊन मोदी साहेब सत्तेवर आले. तेव्हा पेट्रोल, डिझेल, गॅस माझे सरकार सत्तेवर आल्यास कमी होईल, महिला भगिनींची चुलीपासून सुटका होईल अशा आकर्षक घोषणा या सरकार कडून मिळाल्या परंतु सत्तेवर येताच या सरकारची प्राथमिकता सामान्य नागरीक, गृहिणी, युवक न राहता उद्योगपतीना प्राधान्य देणारे सरकार बनले. गरीब आणखी गरीब व्हायला लागला पण मोदी साहेबांचे उद्योगपती मित्र मात्र आणखी श्रीमंत व्हायला लागले.

 

सामान्य महिलांचे दुःख समजून घेऊन आपण वाढवत असलेली ५% जी.एस.टी. मागे घ्याल व सर्व जीवनावश्यक वस्तू स्वस्त कराल ही आशा या पत्राद्वारे संवेंदनशील भाषेत व्यक्त करण्यात आली आहे. ही आर्त हाक महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या निर्देशानुसार व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली, जिल्हाध्यक्षा नम्रता ठेमस्कर यांच्या मार्गदर्शना खाली हे पत्र पंतप्रधान कार्यालयात पाठविण्यात आले आहे. याप्रसंगी वरोरा शहर महिला काँग्रेस कमिटी अध्यक्षा दीपाली माटे, वरोरा तालुका महिला अध्यक्ष रत्नमाला अहिरकर, बोर्डा सरपंच यशोदा खामनकर, महिला काँग्रेस महासचिव शिरोमणी स्वामी, महिला काँग्रेस वरोरा शहर उपाध्यक्ष मीना राहटे, वरोरा माजी नगरसेविका मंगला पिंपळकर, सरपंच उज्वला थेरे, सदस्य बोर्डा प्रिया भोयर, महिला वरोरा तालुका उपाध्यक्ष शुभांगी दातारकर, ग्रा.पं सदस्य बोर्डा प्रतिमा कातकर यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here