लॉयड्स मेटल कंपनी सुरजागड आयर्नतर्फे शालेय विद्यार्थ्यांना स्कुल बॅग, टी-शर्टचे वाटप
सुरजागड :- एटापल्ली तालुक्यात लॉयड्स मेटल कंपनितर्फे सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून विविध शाळेतील विद्यार्थ्यांना एकूण ५७५ स्कुल बॅग व टी-शर्टचे वाटप कंपनीचे मान्यवर व उपस्थित पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
लॉयड्स मेटल कंपनी दरवर्षी सामाजिक उपक्रमाच्या उद्देशाने समाजाप्रती काही देणे असलेली बांधिलकी जोपासून उपक्रम राबवीत असते.अशाच प्रकारे कंपनीतर्फे एटापल्ली तालुक्यातील विविध शाळांना स्कुल बॅग व टी-शर्टचे वाटप करण्यात आले.यामध्ये प्रामुख्याने विनोबा प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा हेडरी येथे ३९५ स्कुल बॅग व टी-शर्ट तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंगेर ययेथे-२५,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुरसगुंडी येथे-४२,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरजागड येथे-१३ व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मल्लमपाडी येथे-६५, असे एकूण-५७५ स्कुल बॅग व टी-शर्टचे वाटप करण्यात आले.
वाटप करतेवेळी कंपनीचे संचालक संजय गुप्ता,एल. साई कुमार सिनिअर गी. एम यांचे मार्गदर्शना खाली व्यंकटेशराव गी. एम, संजीव चांगलानी,बादल सर,मॅनेजर एच.प्रसाद कुमार आर. विकास नारोटे एच. ऑफिसर यांचे हस्ते वितरण करण्यात आला.
या वेळी राजकोंडावार शिक्षक, नंदगीरवार शिक्षक, डस सर, गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित इतर वृंद व कंपनीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
लॉयड्स मेटल कंपनी व्यवस्थापनाने शालेय विद्यार्थ्यांना वितरीत केलेल्या स्कूल बॅग व टी-शर्ट मुळे शिक्षक आणि विद्यार्थी खूप आनंदी झाले व लॉयड्स कंपनी व्यवस्थापनाचे आभार मानले आहे.