आवाळपुरात दत्तजयंती उत्साहात साजरी

0
599

आवाळपुरात दत्तजयंती उत्साहात साजरी

विदर्भातील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. प्रमोद पाणबुडे महाराज, ह.भ.प रोकडे महाराजांच्या किर्तनाने आवाळपुर मंत्रमुग्ध

 

आवाळपुर, नितेश शेंडे : दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्री वल्लभ दिगंबराच्या नाममंत्र घोषणाने आवाळपुर परिसरात मोठया उत्साहात दत्त जयंती सप्ताह साजरा करण्यात आला.तीन दिवसीय सप्ताहात दत्त मंदिरात भजन, कीर्तन, हरिपाठ, काकड आरती, अखंड नाम सप्ताह यांचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी दिनांक 18 डिसेंबर रोजी दत्तजयंती च्या दिवशी सकाळी ह.भ. प. तुमडे महाराज आंध्रप्रदेश यांच्या हस्ते कलश स्थापना करण्यात आली. यावेळी ह.भ.प.काशीनाथ महाराज कोंडेकर, चंद्रभान महाराज झाडे,चतुरकर महाराज, गोरे महाराज यांची विशेष उपस्थिती होती. घटस्थापनेनंतर ह.भ.प. गोहकार महाराज यांचे कीर्तन झाले.

दुसऱ्या दिवशी कीर्तनासाठी प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. प्रमोद पाणबुडे महाराज वर्धा, ह.भ.प. गोहकार महाराज,आवाळपुर यांनी हरिपाठ, कीर्तन करत गावकऱ्यांना मंत्रमुग्ध केले.

शेवटच्या दिवशी गावातील सर्वच मंदिरात फुले व रोषणाई करून पहाटेपासूनच‘दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबराचा गजर सुरू होता. किर्तनानंतर भजनी मंडळाच्या सहकार्याने गावातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. अनेक गावातील भजन मंडळे, भाविक या पालखीमध्ये सहभागी झाले होते.
पालखीची सुरुवात दत्त मंदिर परिसरातून झाली. गावातील नागरिकांनी घरांसमोरील परिसर स्वच्छ करीत रांगोळी चा सहाय्याने आपापल्या घरांसमोर रांगोळी व फुलांनी सजावट करीत पालखीचे स्वागत केले. सप्ताहाची सांगता रोकडे महाराजाच्या ” किर्तनाने झाली. सायंकाळी महाप्रसादाचे मआयोजन करण्यात आले होते. सप्ताह यशस्वीतेसाठी गुरुदेव सेवा मंडळ, आवाळपुर च्या सर्व सदस्यांनी व ग्रामस्थांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here