घुग्घुस येथील नगरपरिषद हद्दीत येणारे तीन टावर सील

0
212

घुग्घुस येथील नगरपरिषद हद्दीत येणारे तीन टावर सील

नगर परिषद हद्दीत येणाऱ्या मोबाईल टावर कडे सन 2007 पासून थकीत मालमत्ता कराचा भरणा न केल्याने आज दिनांक. 11/01/2024 रोजी नगर परिषद कडून दोन एअरटेल व एक व्होडाफोन असे एकूण तीन मोबाईल टावर सील करून नगर परिषद अधिनियम 1965 चे कलम 152 नुसार जप्तीची कार्यवाही करण्यात आली.
नगर परिषद मार्फत थकीत कराचा भरणा करण्याबाबत वारंवार नोटीस देऊन सुद्धा मोबाईल टावर कंपनी यांनी मालमत्ता कराचा भरणा न केल्याने मुख्याधिकारी श्री. डॉ. जितेंद्र गादेवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालय अधीक्षक श्री. निलेश तुराणकर, कर निरीक्षक अर्चना दिंगलवार, पाणी पुरवठा अभियंता सोनाली नागरगोजे, लिपिक शंकर पचारे, मोहसीन कुरेशी, रवींद्र गोहोकार, व इतर कर्मचारी यांच्या मार्फत ही कारवाई करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here