मुंबईतील आंदोलनात चामोर्शी तालुक्यातील कोतवाल सहभागी होणार

0
562

मुंबईतील आंदोलनात चामोर्शी तालुक्यातील कोतवाल सहभागी होणार

चामोर्शी कोतवाल संघटनेचे अध्यक्ष मोरेश्वर साखरे व पदाधिकारी यांनी तहसीलदारांना दिले निवेदन

गडचिरोली, सुखसागर झाडे
चामोर्शी : तलाठी कार्यालय अंतर्गत विविध कामे करणाऱ्या कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा द्यावा, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य संघटनेच्या वतीने मुंबई येथे धरणे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात तालुक्यातील कोतवाल सहभागी होणार आहेत, अशा आशयाचे विविध मागण्यांचे निवेदन संघटनेमार्फत देण्यात आले आहे.

प्रलंबित विविध मागण्यांसाठी १३ डिसेंबर पासून मुंबई येथे राज्यातील जवळपास १२हजार ६३७ कोतवाल आंदोलन करणार आहेत. सदर आंदोलनात चामोर्शी तालुक्यातील कोतवाल कर्मचारी सहभागी होणार आहेत.

कोतवालांना चतुर्थ श्रेणी दर्जा द्यावा, तलाठी व तत्सम पदभरतीमध्ये २५% आरक्षण देण्यात यावे, सेवानिवृत्त कोतवालांना पेंशन व वारसांना सेवेत सामावून घ्यावे. या सह अन्य मागण्याचा समावेश आहे.

महसूल विभागाचे कान, नाक, डोळा समजला जाणारा तळागाळातील शेतकऱ्यांच्या विविध समस्याचे निराकरण करणारा, महसूल विभागाच्या वतीने शासकीय योजनांची, अधिकाऱ्यांने दिलेल्या सूचनांचे पालन करुन अंमलबजावणी करणारा कर्तव्यदक्ष असणाऱ्या कोतवालांना तुटपुंज्या मानधनावर आपल्या जीवनाचा गाडा चालवावा लागत आहे.

मागील अनेक वर्षांपासून कोतवालांना चतुर्थ श्रेणी दर्जा देण्याची मागणी केली जात आहे असे नमूद केले आहे.

अशा विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देताना यावेळी कोतवाल संघटनेचे चामोर्शी तालुका अध्यक्ष मोरेश्वर साखरे, उपाध्यक्ष राजेंद्र गेडाम, सचिव आर. एम. कोडापे, राहुल कोहपरे अन्य कोतवाल संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here