नक्षल्यांच्या गुहेत प्रियंका गांधी यांचे १४ डिसेंबर ला होणार आगमन

0
593

नक्षल्यांच्या गुहेत प्रियंका गांधी यांचे १४ डिसेंबर ला होणार आगमन

काँग्रेस पक्षाच्या वतीने जय्यत तयारी

कांग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांच्या शुभहस्ते १० हजार विध्यार्थींनीना ई-सायकलचे वाटप

गडचिरोली, सुखसागर झाडे
नक्षल्यांची गुहा समजल्या जाणाऱ्या गडचिरोलीत काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने येत आहेत. नक्षलवाद्यांचा दंडकारण्यातील शीर्षस्थ नेता नुकताच मारला गेल्यामुळे नक्षल चळवळीचा रोष धुमसत असताना प्रियंका गांधी यांचा हा दाैरा आयोजित करण्यात आल्याने सुरक्षा व्यवस्थेची धावपळ वाढली आहे.

गडचिरोली गोंदियाच्या माध्यमातून महाराष्ट्रात नक्षल चळवळीचे अस्तित्व जिवंत राखण्याचा भरसक प्रयत्न मिलिंद तेलतुंबडे करीत होता. अलीकडे त्याने महाराष्ट्रातील नक्षल चळवळ आक्रमक करण्यासाठी महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांची नवीन (संयुक्त) झोन कमिटी तयार केली होती. तो मोठा घातपात घडविण्याच्या तयारीत असतानाच १३ नोव्हेंबरला भल्या सकाळी गडचिरोली पोलिसांनी मिलिंदसह २७ नक्षल्यांना कंठस्नान घातले. त्यामुळे महाराष्ट्रासह आजूबाजूंच्या चार प्रांतांतील नक्षल चळवळीलाही जबरदस्त हादरा बसला आहे. या घटनेचा बदला घेण्याची धमकीही नक्षल्यांनी दिली आहे. एवढेच नव्हे तर ते संधीच्या शोधात असल्याचेही वृत्त गुप्तचरांकडे आले आहे. या पार्श्वभूमीवर, मंगळवारी १४ डिसेंबरला काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गडचिरोलीत येत आहेत. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांची धावपळ वाढली आहे. शीर्षस्थ अधिकाऱ्यांकडून दाैऱ्याची सुरक्षा अन् उपाययोजनांच्या संबंधाने नियोजन कसे राहील, त्यावर विचारमंथन केले जात आहे. घातपात, गोंधळाची कुणालाही संधी मिळणार नाही, या संबंधाने अत्याधिक खबरदारी घेतली जाणार आहे. कार्यक्रमस्थळी मोठ्या प्रमाणात नक्षल वॉचर राहणार असून, स्थानिक पोलिसांव्यतिरिक्त आजूबाजूचेही अतिरिक्त सुरक्षाबळ मागवून घेतले जाणार आहे. या संबंधाने रेंजमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, प्रियंका यांना गडचिरोली दाैऱ्यादरम्यान सुरक्षेचे चार स्तरीय कवच राहणार आहे. त्यांना सीआरपीएफचे क्लोज प्रोटेक्शन राहणार आहे. त्यानंतर स्पेशल प्रोटेक्शन, नंतर गडचिरोलीतील निष्णात कमांडो आणि त्यानंतर स्थानिक पोलीस अशी ही सुरक्षा व्यवस्था राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

प्रियंका गांधीजी यांच्या गडचिरोली आगमनानिमित्त कांग्रेस पक्षाच्या वतीने जोरदार तयारी करण्यात येत आहे.

अतिदुर्गम, डोंगर दऱ्याने व्याप्त व ७५% दाट जंगलाने व्यापलेला असा गडचिरोली जिल्हा आहे . नैसर्गिक साधन संपत्तीत अव्व्व्ल असलेल्या या जिल्ह्यातील नागरिकांना आधुनिक सुविधांपासून वंचित राहावे लागते.

मागासलेला, नक्षलग्रस्त जिल्हा अशी ओळख या जिल्ह्याची देशात निर्माण करण्यात आली आहे. हि ओळख आता सर्वांच्या साथीने पुसून काढायची आहे. जिल्ह्याला विकासाची झेप घ्यायची असेल तर महिला सक्षमीकरण, मुलींचे शिक्षण हि मोठी पायरी जिल्ह्याला चढावी लागेल.

गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागात अनेक अडचणींमुळे , दळणवळण सुविधांच्या अभावी अनेक मुली शिक्षणापासून वंचित असल्याचे दुख:द बाब आहे.

शहरी भागात आपण वाचत असतो की “शिकलेली आई घर पुढे नेई”. पण, या भागात शिक्षण प्रसाराच्या प्राथमिक अवस्थेतच असल्याने कित्येक आई आणि त्यांच्या पोटी जन्म घेणारी मुलगी या दोघीही निरक्षरच आहेत.

इतर जिल्ह्यांच्या तुलनेत १० ते १५ वर्ष मागे असलेल्या गडचिरोली जिल्ह्याला जर वेगाने विकासाच्या मुख्य प्रवाहात आणायचे असेल आणि विकासाच्या स्पर्धेत झेप घ्यायची असेल तर महिलांना शिक्षण , शिक्षणासाठी दळणवळण सुविधा आवश्यक आहे.

दुर्गम भागातील मुलींच्या शिक्षणातील अडथळे दूर करण्याच्या उद्देशाने सीएसआर निधीतून गडचिरोली जिल्ह्यातील “विध्यार्थींनीनां ” आगामी १४ डिसेंबर २०२१ ला कॉंग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांच्या हस्ते गडचिरोली जिल्ह्यातील १०,००० मुलींना इलेक्ट्रिक सायकलचे वाटप करण्यात येणार आहे.

शिक्षणासाठी कोसो मैल पायदळ जाण्याचे दुर्दैव आता या १०,००० मुलींच्या जीवनात नसणार हि सर्वात मोठी समाधानाची बाब आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here