शासनाच्या दिशा निर्देशाप्रमाणे कोरोना लस टोचून घ्यावी
आमदार डॉ देवरावजी होळी यांचे जनतेला आव्हाहन
चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात
दिनांक १६मार्च २०२१ रोजी
गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी आज ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे कोरोना लस घेतली. शासनाच्या दिशा निर्देशाप्रमाणे सर्वांनी कोरोना लस टोचून घ्यावी असे आवाहन जनतेला त्यांनी याप्रसंगी केले. यावेळी चामोर्शी तालुकाध्यक्ष दिलीपजी चलाख, महामंत्री साईनाथजी बुरांडे ,भाजपा नेते जयरामजी चलाख व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते*
