जैताईची भाऊबीज ग्रामीण रुग्णालयात

0
418

जैताईची भाऊबीज ग्रामीण रुग्णालयात

 

यवतमाळ, मनोज नवले
जैताई मंदिर व जैताई अन्नछत्र मंडळाने आपली भाऊबीज दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ग्रामीण रुग्णालयात साजरी केली. ग्रामीण रुग्णालयात दाखल असलेल्या व दिवाळीच्या आनंदा पासून वंचित असलेल्या सर्व भगिनींना देवस्थानच्या वतीने साडी, ब्लाऊज पीस, मिठाई व बिस्कीट पुडा देऊन त्यांच्या चेहर्यावर आनंद फुलविण्यात आला. मिठाई व बिस्कीट पुडे स्नेहा घी भंडारच्या सौजन्याने देण्यात आले.

या प्रसंगी माधव सरपटवार, मुन्नाभाऊ तुगनायत, मुन्नाभाऊ पोद्दार, नामदेव पारखी, प्रमोद वासेकर, वाल्मिक बावणे, दिवाण फेरवानी, प्रशांत महाजन, सुरेश मांडवकर, रविंद्र पाराशर, मयूर गोएंका, उत्तम गिरसावळे उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here