विरुर स्टेशन परिसरातील विजेची समस्या तात्काळ सोडवा – माजी आमदार अँड. संजय धोटे

0
407

विरुर स्टेशन परिसरातील विजेची समस्या तात्काळ सोडवा – माजी आमदार अँड. संजय धोटे

माजी आमदार अँड.संजय धोटे यांच्या नेतृत्वात कार्यकारी अभियंता यांना निवेदनाद्वारे केली मागणी

 

राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन उपविभागीय क्षेत्रात येणाऱ्या मौजा विरुर स्टेशन केंद्रातील विरुर स्टेशन, चिंचोली, अन्नूर, अंतरगाव, कविठपेठ, धानोरा ईत्यादी गावातील महावितरण कंपनीची व्यवस्था एकदम बिकट झाली असून मागील 8 ते 10 दिवसापासून ऐन शेतीचे हंगाम मध्ये शेतावरील मोटारपंप विद्युत व्यवस्था बंद आहे. पाणी (सिंचन) देण्याचे वेळी शेतकऱ्यांची पिके करपून आणि वाळून जात आहे या सर्व मागणी घेऊन तसेच ही समस्य तात्काळ सोडविण्यात यावे याकरिता राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड. संजय धोटे यांच्या नेतृत्वात तसेच विरुर स्टेशन परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत महावितरण विद्युत कंपनी बल्लारपूरचे कार्यकारी अभियंता ठावरे यांच्या सोबत चर्चा करून निवेदन देण्यात आले.

धानोरा, कविठपेठ, अन्नूर, अंतरगाव गावातील शेतकऱ्यांची वीज कापण्यात आली. चिंचोली, अन्नूर, अंतरगाव तसेच अनेक भागातील गुड्यावरील विद्युत पोल अनेक वर्षांपासून जिर्णो अवस्थेत असल्यामुळे भविष्यात जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे नाकारता येणार नाही, तरी यासर्व समस्याची त्वरित दाखल घेऊन सोडविण्यात यावे अशीही मागणी माजी आमदार अँड संजय धोटे यांनी केली आहे. शेतकऱ्यांची होणारी अडचण तसेच हिवाळ्यात विजेचा लपंडाव यामुळे उद्भवणाऱ्या समस्या वर उपयोजना करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली.

यावेळी माजी आमदार अँड संजय धोटे यांच्यासह भाजपाचे सर्कल प्रमुख सतीश कोमरवेल्लीवार, चिंचोली सरपंच पिलाजी भोंगळे, ओबीसी आघाडी तालुका अध्यक्ष शंकर धनवलकर, भाजयुमो तालुका महामंत्री रवि बुरडकर, बंडू हजारे, वसंता आसुटकर, मधुकर आसुटकर, अशोक जुलमे, रवि रासपले, मारोती कोरमारे, सुभाष रासपले, गुलाब रासपले, बोबाटे तसेच विरुर स्टेशन परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here