दिल्लीत लोकशाहीचा, संविधानाचा गळा घोटू पाहणाऱ्या मोदी सरकारचा निषेध

0
317

दिल्लीत लोकशाहीचा, संविधानाचा गळा घोटू पाहणाऱ्या मोदी सरकारचा निषेध

दिल्लीतील मतदारांचा अनादर करणाऱ्या मोदी सरकारविरोधात चंद्रपूर मध्ये आपची निदर्शने

दिल्लीतील लोकनियुक्त सरकारच्या प्रशासनातील अधिकारी नेमणे, बदली करण्याच्या अधिकारावर गदा आणणाऱ्या केंद्र सरकारच्या अध्यादेशाचा निषेध म्हणून आज आम आदमी पार्टी तर्फे देशभर विविध ठिकाणी निदर्शने करण्यात आली. चंद्रपूर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून जटपूरागेट पर्यंत केंद्र सरकारच्या निषेधार्थ रॅली काढण्यात आली. येथे आज आम आदमी पार्टीतर्फे जिल्हा संयोजक सुनिल देवराव मुसळे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली.

आठ वर्षांपूर्वी केंद्र सरकारने एक नोटिफिकेशन काढून दिल्लीतील राज्य सरकारचे प्रशासकीय बदल्या व नियुक्ती करण्याचे अधिकार काढून घेत आपल्या ताब्यात घेतले होते. त्याला आम आदमी पार्टी सरकारने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. तब्बल आठ वर्ष ही लढाई चालू होती. सुप्रीम कोर्टाच्या बेंचने हे सर्वाधिकार पुन्हा एकदा दिल्लीतील लोकनियुक्त केजरीवाल सरकारकडे राहतील असा ऐतिहासिक निर्णय दिला. परंतु केंद्रातील भाजप सरकारने सुप्रीम कोर्टाला सुट्टी लागल्या दिवशी एक अध्यादेश काढत हे अधिकार पुन्हा आपल्या हातात घेतले आहेत. हा अध्यादेश दिल्लीतील मतदारांचा अवमान करणारा असून लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. त्याचा निषेध म्हणून आज निदर्शने करण्यात आल्याचे सुनील मुसळे यांनी सांगितले.

दिल्लीमध्ये 70 पैकी 62 विधानसभा जागा जिंकून आम आदमी पार्टीने जनतेची कामे सुरू केली. परंतु त्यात केंद्र सरकार नियुक्त राज्यपालांमार्फत सतत हस्तक्षेप केला जात असून लोकांची कामे अडवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

आता अध्यादेशाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आम आदमी पार्टी आणि भाजप सरकार एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. यासंदर्भात आम आदमी पार्टी राज्यसभेमध्ये इतर सर्व विरोधी पक्षांचाही पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे.

सुप्रीम कोर्टाने आप सरकारच्या बाजूने निर्णय दिल्यानंतरही ह्या अध्यादेशाच्या मार्गे बदली, नियुक्तीचे अधिकार मोदी सरकारने आपल्याकडे घेतले आहेत याचा निषेध केला गेला. याप्रसंगी आप चे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे, संघटन मंत्री नागेश गंडलेवार, संघटन मंत्री भिवराज सोनी , जिल्हा सचिव संतोष दोरखंडे, युवा जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, महिला अध्यक्षा ऍड सुनीता पाटील, जितेंद्र भाटिया, राजू कुडे , सुनील सदभैया, स्वप्नील घागरगुंडे, बादल खोटे, भीमराव मेंढे, अमित बोरकर, प्रशांत धानोरकर, ऍड तबसुम शेख, गोकुळ बन्सोड, विद्या मोहूर्ले, प्रशांत रामटेके, ज्योती बाबरे, सिकंदर सागोरे, रहमान खान, समृद्धी पडगेलवार, विजय कुंभारे, कल्पना शिरसागर, रूपा काटकर, जास्मीन शेख, रामदास चौधरी, अक्षय, मुकेश, प्रीतम जेंडे, हर्षवर्धन बोरकर, समीर भाई, युसूला आहुले, श्री, सय्यद अश्रफ अली, मंगलाबाई मुक्के, किरण सन्ना, चांगदेव, सतीश श्रीवास्तव, अमर चांदेकर, सलमा सिद्दकी, असिफ शेख, पुष्पा बुद्धा, बालाजी मुंजे, आशिष गेडाम, सुधाकर गेडाम, प्रसना रामटेके, नन्दकिशोर सिन्हा, सुशांत मोहूर्ले, सुजित चडगुलवार, दिलाबर नावघरे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here