वणी तालुक्याचे येनक येथील ग्रामपंचायत सदस्यांचा दणका

0
472

वणी तालुक्याचे येनक येथील ग्रामपंचायत सदस्यांचा दणका

 

वणी/यवतमाळ, मनोज नवले 

दि.28/9/2021 रोजी म.रा.विज वितरण कंपनीने येनक ग्राम पंचायती अंतर्गत येत असलेल्या केवळ वार्ड क्र.1चा विजपुरवठा बंद करण्यात आला. त्या अगोदर 22/8/2021 रोजी महावितरन कंपनीने येनक ग्रामपंचायतीला थकबाकी भरण्याचे पत्र दिले, परंतु विद्यमान सरपंचला मासीक सभेत विषय मांडुनही जाग आली नव्हती.वार्ड क्र.1ची विज कापणे परंतु येनक गांवातील वार्ड क्र.2 व वार्ड क्र.3 विज पुरवठा सूरू असणे या घटनेतील कुटील राजकिय खेळ,परंतु वार्ड.क्र.1मधील जनतेच्या जिवनाशी खेळल्या जात असल्याचे ग्रामपंचायत सदस्य अनिल तेलंग व ज्योती बोधाणे यांच्या लक्षात आला.म्हणुन गांधी जयंतीचे दिवशी सरपंच यांना निवेदन देवून ताबडताेब विज पुरवठा सुरू करण्याची मागणी केली.त्याला रितसर चर्चा करण्या ऐवजी सरपंचानी ग्रामपंचायत कार्यालय सोडुन देत सामान्य नागरीक व ग्रामपंचायत सदस्याना तिथेच बसवुन ठेवले.शेवटी पुर्ण गांवाची विज बंद करा किंवा वार्ड क्र1ची लाईन सुरू करा यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत सदस्य अनिल तेलंग व.ज्योती बोधाणे आणि सहकारी मिरा बांदुरकर,अलका येलेकर,मिना लिक्केवार, प्रेमिला राहूलवार,प्रेमिला लिक्केवार,संगिता फुलझले,माया चटर्जी ,लक्ष्मी भाहादुरे, मनीषा ढाक बैठै आंदोलन करून प्रश्न सोडविण्यात आला. त्यामुळे वार्ड क्र1 मधे लोकांनी आनंद व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here