हिवरी येथील काँक्रेट रस्त्याचे भूमिपूजन

0
379

हिवरी येथील काँक्रेट रस्त्याचे भूमिपूजन

 

वणी/यवतमाळ, मनोज नवले 

2 ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पर्वावर तालुक्यातील हिवरी येथे ठक्कर बाप्पा योजने अंतर्गत सिमेंट काँक्रेट रस्त्याचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

तालुक्यातील हिवरी (जुनी) येथे जिल्हा वार्षिक निधीतून ठक्कर बाप्पा योजने अंतर्गत 4 लक्ष रुपये चा निधी रस्त्या साठी जिल्हा परिषद सदस्य अनिल पाटील दरेकर यांच्या प्रयत्नाने मंजूर झाला.
तसेच नवीन वस्ती येथे सुद्धा ठक्कर बाप्पा योजने अंतर्गत 7.5 लाख रुपये चे निधी मंजूर झाल्याने 2 ऑक्टोबर रोजी भूमिपूजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पंचायत समिती सभापती सौ शितलताई पोटे होते तर उद्घाटक म्हणून वेगाव बोटोनी गटाचे जिल्हा परिषद सदस्य अनिल पाटील देरकर प. स. सदस्या सौ सूनिताताई लालसरे होते.तसेच सरपंच युवराज घोसले ,शंकर जी लालसरे, संदीप आस्वले .ग्राम पंचायत सदस्य तथा तंटा मुक्ती चे अध्यक्ष,सदस्य,तसेच समस्त गावकरी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन संतोष आस्वले यांनी केले तर आभार मारोती सोमलकर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here