वृक्ष संवर्धन काळाची गरज – ॲड. वामनराव चटप

0
556

वृक्ष संवर्धन काळाची गरज – ॲड. वामनराव चटप

● यशोधन विहार नगरीत वृक्षारोपण
● विविध प्रजातीची लावली 500 झाडे

 

नांदाफाटा : झाडांचे महत्त्व अन्यनसाधारण आहे त्यामुळे वृक्ष संवर्धन करणे काळाची गरज असल्याचे मत माजी आमदार ॲड वामनराव चटप यांनी व्यक्त केले. नांदा फाटा येथील यशोधन विहार माळा कॉलनीत आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी उपसभापती तथा माजी सरपंच शामसुंदर राऊत, प्रमुख अतिथी म्हणुन बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी रिजनल मॅनेजर विनय राजे, राहुल देशपांडे, माजी जि प सदस्य शिवचंद्र काडे, कामगार नेते साईनाथ बूच्चे, माजी सभापती संजय मुसळे, रवींद्रलाल श्रीवास्तव, पौर्णिमा श्रीवास्तव, प्राचार्य अलेक्झांडरीना डिसूझा, माजी उपसरपंच पुरुषोत्तम आस्वले, प्रकाश बोरकर, डॉ. बााडासाहेब चौधरी हिरापूर येथील उपसरपंच अरुण काळे, कामगार, आवारपुर उपसरपंच बाळकृष्ण काकडे, हबीब शेख आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी विविध प्रजातीची 500 झाडे लावण्यात आली. त्यासोबतच म्हाडा कडून मिळणाऱ्या घरांविषयी ची माहिती यावेळी भूपेन चंद्रिकापुरे यांचे मार्फत उपस्थित नागरिकांना देण्यात आली. “वृक्ष नाहीतर जीवन नाही” हा संदेश यावेळी आपल्या भाषणातून कार्यक्रमाचे अध्यक्ष शामसुंदर राऊत यांनी उपस्थितांना दिला. गावातील तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सामाजिक दायित्व जपत श्री शिवाजी इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज नांदा फाटा येथे शिक्षक वृंदांनीही यावेळी वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. संचालन ग्रामदुत फाऊंडेशन चे अध्यक्ष रत्नाकर चटप यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here