CMA Intermediate आम्रपाली वाकडे पास

0
604

CMA Intermediate आम्रपाली वाकडे पास

राजुरा : २९ मार्च २०२१ मध्ये राष्ट्रीय स्तरावर सीएमए कोर्स चा निकाल जाहिर करण्यात आला. यात चनाखा सारख्या ग्रामिण क्षेत्रातील आम्रपाली महानंद वाकडे हि पहिल्याच प्रयत्नात चेन्नई येथील सीएमए इन्स्टिट्यूट मधुन डिसेंबर २०२० मध्ये घेण्यात आलेला CMA, Intermediate कोर्स यशस्वी पूर्ण केलेला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील चनाखा सारख्या ग्रामीण भागातून सदर कोर्स पात्र करणारी आम्रपाली वाकडे पहिलीच होय. आम्रपालीने Foundation Course बारावी नंतर पहिल्याच प्रयत्नात उत्कृष्ठ मार्क्सने पात्र केलेला आहे. आता CMA intermediate पास झाली. CA, CMA, CS संपूर्ण जगात उच्च दर्जाचे कोर्सेस म्हणून मान्यताप्राप्त आहेत. हा कोर्स एखादाच विद्यार्थी पहील्या प्रयत्नात पास करतो. त्यामुळे आम्रपाली ही सम्पूर्ण जिल्ह्यात कौतुकास पात्र ठरली आहे. आम्रपालीस प्रसिद्ध मनोवैज्ञानिक डॉ. सत्यपाल कातकर यांचे समुपदेशन व मार्गदर्शन लाभले. ती आपल्या यशाचे श्रेय आई वडील, इन्स्टिट्यूट मधील प्रोफेसर व समुपदेशक डॉ. सत्यपाल कातकर ह्यांना देते. तिचे जिल्ह्यातील शिक्षणप्रेमी विजय तेलंग, सिध्दांत कातकर, विजय उपरे, विशु वानखेडे, प्रशांत खाडे सर, श्रिधर मालेकर, युवराज भगत, प्रमोद कांबळे, उमेश खंगार, भगिरथ वाकडे, प्राचा्र्य गंडरटवार, प्राचा्र्य संतोष बक्षी, ज्योत्स्ना वाकडे, रघुमणी ठाकुर, भारत बक्षी, कुलदिप पाटिल, अनुरुध्द वाकडे, मोहन खोब्रागडे, राघवेंद्र मुन आर. एफ. ओ. आदी अभिनंदन तथा कौतुक करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here