शेतक-यांच्या भारत बंदला चंद्रपूर जिल्ह्यात उत्स्फुर्त प्रतिसाद !

0
616

शेतक-यांच्या भारत बंदला चंद्रपूर जिल्ह्यात उत्स्फुर्त प्रतिसाद ! कुठेही अप्रिय घटना नाही ! ठिकठिकाणी कडक पाेलिस बंदोबस्त ! गांधी चाैकात विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे निदर्शने तर चांदा यंग ब्रिगेडची मुख्य मार्गाने लक्षवेधक विशाल रैली !वराेरा तालुक्यात रस्ता राेकाे !

🟪🛑🟢चंद्रपूर 💠🟣किरण घाटे 🟢💠

तीन क्रूषी कायद्यांविराेधात शेतकरी वर्गांनी पुकारलेल्या आंदाेलनाला आता सर्वच स्तरांवरुन उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून आज मंगळवार दि .८डिसेंबरला दिलेल्या भारत बंद हाकेला चद्रपूरसह जिल्ह्यातील बल्हारपूर , भद्रावती , वराेरा गाेंडपिपरी चिमूर तसेच जिल्ह्यातील इत्तर तालुक्यातही या बंदला उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे व्रूत्त आहे .दरम्यान आज सकाळपासूनच चंद्रपूरची बाजारपेठ पूर्णता बंद असल्याचे चित्र शहराचा फेरफटका मारला असता प्रत्यक्षात दिसून आले .🟢🟣🛑आजच्या या भारत बंदला काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस , मनसे, शिवसेना , आप पार्टी , किसान आंदोलन , युवासेना , महिला आघाडी शहरातील शेतकरी सामाजिक व व्यापारी संघटनेनी स्वयंस्फुर्तिने आपला पाठिंबा दर्शविला हाेता . वराेरा तालुक्यात मनसे व प्रहार जनपक्षाच्या वतीने रस्ता राेकाे आंदोलन करण्यांत आले. दरम्यान विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या वतीने भूतपूर्व खासदार नरेश पुगलिया यांचे नेर्तूत्वाखाली चंद्रपूरच्या स्थानिक गांधी चाैकात केन्द्र सरकारच्या विराेधात निदर्शने करण्यांत आली तर स्थानिक चांदा यंग ब्रिगेडच्या वतीने पठाणपूरा मार्गावरील विद्यमान अपक्ष आमदार किशाेर जाेरगेवार यांचे जनसंपर्क कार्यालयातुन मुख्य मार्गाने घोषणा देत भव्य रैली काढण्यांत आली .🌼🔶🟦🟡किसान आंदाेलन व जय जवान जय किसान संघटनेनी ही आजच्या शेतकरी आंदाेलनाला आपले समर्थन देत एक विशाल रैली काढली.तर काहीनी बाईक रैली काढुन शेतक-यांच्या रास्त मागण्यांकडे आज केन्द्र सरकारचे लक्ष वेधले. 🟪🌀🟦🛑भारत बंदला छाेट्या व्यवसाय धारकांनी देखिल प्रतिसाद दिला .दुपारी येथील गांधी चाैक कार्यकर्त्यांच्या गर्दीने अक्षरशा फुलुन गेले हाेते .🟦🛑🟢🟣शहरातील प्रत्येक मार्गावर पाेलिस प्रशासनाच्या वतीने कडक पाेलिस बंदोबस्त ठेवण्यांत आला हाेता .🟢🟣🟩🌼जिल्ह्यात या भारत बंदच्या दरम्यान कुठलेही अप्रिय घटना घडली नाही ! शेतक-यांच्या मागण्या रास्त व याेग्य असुन केन्द्र सरकारने त्या साेडवायला हव्या असा सुर आज प्रत्येकांच्या बाेलण्यांतुन दिसुन आला🟡🌀🛑🟦 गेल्या काही दिवसांपासून शेतक-यांचे आंदोलन दिल्लीत सुरु असुन ते अधिक तीव्र हाेण्यांची चिन्हे आता दिसू लागली आहे .भारत बंद दरम्यान आज शहरातील शासकीय कार्यालये व आँटाे सेवा नेहमी प्रमाणे सुरु हाेती .🟣🛑🟢💠येथील गंज वार्डातील भाजी मार्केट बंद हाेते तर स्थानिक गाेलबाजारात काही भाजी विक्रेत्यांनी दुकाणे सुरु ठेवली हाेती . मात्र हिरवा भाजी बाजार खरेदीसाठी ग्राहकांची बाजारात गर्दी दिसून आली नाही .एकंदरीत आजच्या बंदला उत्तम प्रतिसाद मिळाला हे मात्र तेवढेच खरे !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here