गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

0
324

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

वरोरा :- माध्यमिक शालांत परीक्षेत ९० टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थीनींचा सत्कार सोहळा भारतीय जनता पार्टी शहर व तालुका घाटंजी तर्फे नुकताच पार पडला.
भारताचे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात माध्यमिक शालांत परीक्षेत गुणवत्ता यादीत समाविष्ट असलेल्या एसटीएस कॉन्व्हेन्टच्या विद्यार्थीनी श्वेता दत्ता ठाकरे ९६ टक्के, श्रृतिका गजानन भोयर ९५ टक्के, वंशिका पंकज गडीया ९४ टक्के व दिपीका संदीप गोडे ९३.४० टक्के यांचा प्रमुख पाहुणे केळापूरचे आमदार संदीप धूर्वे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, भेटवस्तू देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी एसपीएम कॉन्व्हेन्ट चे प्रिन्सिपॉल ताजने, शिक्षकवृंद सर्वश्री गोहणे, राऊत, सीमा ठाकरे, पीलावन मॅडम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here