लाठी येथे पशुचिकित्सा शिबिर संपन्न

0
671

लाठी येथे पशुचिकित्सा शिबिर संपन्न

 

कोठारी, राज जुनघरे
गोंडपिपरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पशु वैद्यकीय दवाखाना श्रेणी २ मौजा लाठी येथे एक दिवसीय जनावरांच्या विविध आजाराचे तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी सदर शिबिरात जनावरांना रोगप्रतिबंधक लसीकरण, जंतनाशक औषधाचे वितरण, गोचीड निर्मूलन, कृत्रिम रेतन, वंध्यत्व व गर्भधारणा तपासणी करण्यात आले.सदर शिबिरात गावातील गायी, म्हशी, शेळ्या व बैल आदी जनावरांना लागण होणाऱ्या विविध आजारांच्या संदर्भात रोगप्रतिबंधक लसीकरण व तपासणी करून पशुपालकांना मार्गदर्शन करण्यात आले. सोबतच जनावरांच्या कुठल्याही आजाराच्या बाबतीत घरगुती अथवा गावठी उपचार न करता स्थानिक दवाखान्यात दाखवून योग्य उपचार घेण्याचे आवाहन यावेळी डॉक्टरांकडून करण्यात आले. यावेळी सदर शिबिराला डॉ.विकास ताजणे, पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रिया डोंगरे, पशुधन पर्यवेक्षक विलास बावणे व गावातील इतर नागरीक तथा पशुपालक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here