अल्पसंख्यांक समाजाचे औक्षवंन? कल्याणकारी योजनेचा फज्जा

0
439

अल्पसंख्यांक समाजाचे औक्षवंन? कल्याणकारी योजनेचा फज्जा

शिक्षण, संरक्षण, आरक्षणाची गरज – आबिद अली

 

कोरपना, प्रवीण मेश्राम : राज्यामध्ये युतीचं शासन जाऊन महा विकास आघाडीचे सरकार आले आल्या आल्या महापूर अतिवृष्टी दुष्काळ कोरोना अशा संकटातून मार्गक्रमण करीत शासन दिलासा देण्याचा प्रयत्न करता करता दोन वर्षाचा कालावधी संपला आहे मराठा आंदोलन धनगर समाजाचे आरक्षण आंदोलन त्याचबरोबर मुस्लिम आरक्षणाची देखील मागणी तेवढीच प्रभावी व अत्यंत गरजेची होती देशातील व राज्यातील अनेक दुर्बल घटक व आर्थिक मागासलेले घटकांसाठी आरक्षणाची मागणी अनेक राजकीय पक्ष व सामाजिक संघटना करीत असताना मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा हवेत विरल्या चे चित्र निर्माण झाले 2006 पासून प्रामुख्याने न्यायमूर्ती सच्चर समिती न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा व महाराष्ट्र शासनाने 2014 मध्ये नियुक्त केलेल्या डॉ महमूदउर रहमान समिती आयोग व समितीचे अहवाल मुस्लिम समाजाच्या आर्थिक सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणाचा आरसा अहवालातून अधोरेखित केला आहे मुस्लिम समाजाच्या आरक्षणासह पायाभूत व मूलभूत शैक्षणिक योजना शिफारशीसह केल्या न्यायालयाने देखील मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक आरक्षणा ची गरज नमूद केली तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मुस्लिमबहुल भागातील वस्त्या आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी प्रधानमंत्री 15 कलमी कार्यक्रम राबवण्याची योजना सुरू केली होती मात्र गेल्या सात वर्षांपासून दुर्दैवाने राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी ग्रामीण व जिल्हा स्तरावर प्रभावीपणे राबविल्या केली नाही हे दृश्य सर्वत्र असून पंधरा कलमी कार्यक्रम हा अल्पसंख्याक कल्याण मंत्रालय केंद्र शासन यांच्या अर्थसंकल्पीय तरतूद व घोषणा पुरताच मर्यादित असल्याचे तसेच मुस्लिम समाजाच्या हिताचे व विकासाचे उपक्रम गुंडाळल्या गेले की काय असे सर्वत्र चित्र निर्माण झाले आहे आश्चर्य म्हणजे पंधरा कलमी कार्यक्रम अल्पसंख्यांक कल्याण आयोग व मुस्लिम समाजाच्या कल्याणाच्या योजना धिकार्‍यांनाच माहीत नसल्याचे नुकतेच राज्यसभा खासदार डॉक्टर फौजिया खान यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत विदारक चित्र उघड झाले हीच परिस्थिती संपूर्ण राज्यभर दिसते मुस्लिम समाज हा राजकीय दृष्ट्या वंचित घटक ठरत असल्याने देशाच्या राज्या चा नागरिक म्हणून या समाजाच्या विकासाची योजना आखून त्याची प्रमाणिक अंमलबजावणी कधीच झाली नाही हा समाज आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या अत्यंत पिछाडीवर गेल्याचे अनेक अहवालातून सिद्ध झाले असताना या समाजाला विशिष्ट पक्षाची वोट बँक म्हणून वापर करून घेतला निवडणुकीच्या तोंडावर महानगरपालिका नगर परिषद नगरपंचायत जिल्हा परिषद यावर लक्ष केंद्रित करून विविध राजकीय पक्ष अल्पसंख्यांक सेलू आघाड्याची अध्यक्षपद नियुक्ती देऊन मुस्लिमांच्या पाठीवर पाठ थोपटून शाबासकी देत नसले तरी समाजाला मतदानाचा परतावा त्यांना देण्याचा प्रयत्न कधीच झाला नाही स्वतंत्र काळानंतर देशात राज्यात सर्वाधिक सत्ता भोगलेल्या शासनकर्त्यांनी मुस्लिम समाजाच्या विकासाच्या आरक्षणाचा मागणीचा दिवा तेवत ठेवत निवडणुकीपूर्वी घोषणांचा पाऊस पाडण्याचा प्रयत्न नेहमी झाला ही खंत समाजाच्या नवीन तरुणांमध्ये खदखदत आहे पुरोगामी शाहू फुले आंबेडकर विचारसरणीच्या महाराष्ट्र मध्ये मुस्लिम समाजाच्या पंधरा कलमी कार्यक्रम अंमलबजावणीसाठी जिल्हा स्तरावर अल्पसंख्यांक कल्याण समिती गठीत झालेल्या नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here