मॅजिक बस इंडिया फाऊंडेशनच्या वतीने बालपंचायत मेळावा संपन्न

161

मॅजिक बस इंडिया फाऊंडेशनच्या वतीने बालपंचायत मेळावा संपन्न


वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा.प्रशांत लोखंडे सर यांच्या मार्गदर्शनात व तालुका निरीक्षक मा.निकिता ठेंगणे यांच्या नियंत्रणात आज दिनांक 16/02/2023 ला मा.सा. कन्नमवार सभागृह येथे बालपंचायात मेळाव्याचे (चर्चासत्र) आयोजन करण्यात आले. चर्चासत्रा करिता 54 जिल्हा परिषद शाळा व खाजगी शाळेतील बलपंचायतीने चर्चासत्रात सहभाग घेतला.

सर्व प्रथम प्रमुख पाहुणे,तहसीलदार होळी साहेब,नायब तहसीलदार पवार साहेब,संवर्ग विकास अधिकारी देव घुनावत साहेब, वैद्यकीय अधिकारी डॉ.समीर थेरे साहेब, गट शिक्षणाधकारी वैभव खांडरे साहेब,शिक्षण विस्तार अधिकारी गुज्जनवार मॅडम,पिपरे मॅडम,केंद्रप्रमुख कोपुलवार सर,भाकरे सर, आत्त्राम सर, बलकी सर, मुख्यध्यापक व शाळेतील शिक्षक यांची कार्यशाळेला उपस्थिती होती, कार्यक्रमाचे प्रास्ताविक निकिता ठेंगणे तालुका निरीक्षक यांनी केले तर संदेश रामटेके यांनी आभार मानले,कार्यशाळेत शालेय मंत्रिमंडळ म्हणजेच बलपंचायातीचे महत्व, जबाबदाऱ्या, कर्तव्य, व त्यांचे अधिकार यावर सर्व मंत्रिमंडळाला मॅजिक बस चे शाळा सहाय्यक अधिकारी दिनेश कामतवार,शुभांगी रामगोनवार,मंजुषा कूरेकार,सोनम लाडे यांनी सविस्तर माहिती दिली. शाळेमध्ये असलेल्या विविध समस्या विद्यार्थ्यांनी कशा ओळखाव्या आणि त्यावर उपाय योजना कशा कराव्या, बालपंचायतीच्या सभेत प्रस्ताव मांडणे, सादर करण्यात आलेल्या प्रस्तावा वर चर्चा करणे,कठीण समस्या व मोठ्या निर्णयांसाठी मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती, तसेच ग्रामपंचायतीचे सहकार्य कशा पद्धतीने घ्यावे. बालपंचायत सभेचे अहवाल लेखन कसे करावे इत्यादी बाबतीत सखोल मार्गदर्शन देण्यात आले. त्या सोबतच बलपंचायतीची मासिक सभा कशा प्रकारे आयोजित केली जाते याचे प्रात्याक्षिक जिल्हा परिषद हायस्कूल नांदगाव येथील शालेय मंत्रिमंडळाने सादर केले. उपस्थित सर्व शालेय
सदर कार्यशाळा संपुर्ण चर्चासत्र हे तालुका समन्वयक निकिता ठेंगणे व मुल येथील सर्व शाळा सहायक अधिकारी व मुल येथील सर्व समुदाय समन्वयक यांच्या अथक परिश्रमाने यशस्वीरित्या बालपंचायात मेळावा पार पडला.

advt