18 फेब्रुवारी पासून अंचलेश्वर मंदिर येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने चार दिवसीय विविध भाषीय भजन महोत्सवाचे आयोजन

0
358

18 फेब्रुवारी पासून अंचलेश्वर मंदिर येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने चार दिवसीय विविध भाषीय भजन महोत्सवाचे आयोजन

 

महाशिवरात्री निमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने अंचलेश्वर मंदिर प्रांगणात चार दिवसीय विविध भाषीय भजन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असुन 18 फेब्रुवारीला यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष तथा चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते सदर भजन महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. सदर भजन महोत्सव 21 फेब्रुवारी पर्यंत चालणार असुन जिल्ह्यातील भजन मंडळांनी या भजन महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहण यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे.

भजन मंडळांना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे या करिता यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मागील वर्षा पासुन महाशिवरात्री निमित्त भजन महोत्सव आयोजित केल्या जात आहे. यंदाही महाशिवरात्री निमित्त 18 फेब्रुवारीला अंचलेश्वर मंदिराच्या प्रांगणात विविध भाषीय भजन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर भजन महोत्सव चार दिवस चालणार असुन 21 फेब्रुवारीला भजन महोत्सवाचा समारोप होणार आहे. यात विविध भाषीय शेकडो भजन मंडळ सहभागी होणार आहे. युवा पिढीला भजनाची आवड निर्माण व्हावी भजनाच्या मधुरतेने शहरात भक्तीमय वातावरण निर्माण व्हावे हा सुध्दा या भजन महोत्सवाच्या आयोजनाचा मागचा उद्देश आहे. शहरातील नागरिकांनी आणि भजन मंडळांनी सदन भजन महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहण यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले असुन नोंदनीसाठी भजन मंडळांनी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहणही यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here