महसुल पथकांच्या धडक कारवायांत आता पावेताे ३९ अवैध रेतीची वाहने जप्त, ५ जणांवर फाैजदारी गुन्हा दाखल!
चंद्रपूरचे तहसीलदार निलेश गाैंड यांची कार्यवाही

चंद्रपूर : किरण घाटे
चंद्रपूर तालुक्यातील विविध भागात अवैधरित्या रेतींची वाहने पकडुन वाहने मालकांकडुन ४३लाखांपेक्षा अधिक दंड वसुल करुन ताे खजीना दाखल केल्याचे व्रूत्त आहे. सदरहु धडक कारवाया चंद्रपूरचे कर्तव्यदक्ष तहसीलदार निलेश गाैंड व त्यांचे मार्गदर्शनाखाली असलेल्या महसुल विभागाचे पथकांने केल्या आहे. या धडक कारवायांमुळे तालुक्यातील अवैध रेती तस्करांचे अक्षरशा धाबे दणाणले असुन उपराेक्त कारवायांच्या अनुषंगाने चंद्रपूर तालुक्यातील (विविध ठिकाणच्या) पाच अवैध रेती तस्करांवर फाैजदारी गुन्हा दाखल झाल्याचे व्रूत्त आहे. एकीकडे काेराेनाचे संकट जिल्ह्यात निर्माण झाले असतांना या कामात सर्व अधिकारी व कर्मचारी व्यस्त झाले आहे असे काही अवैध रेती माफियांना वाटु लागले हाेते. परंतु येथील तहसीलदार गाैंड यांनी काेराेना संकटातही आपले काम तेवढ्याच प्रामाणिकपणे व जबाबदारीने पार पाडुन गुप्त माहितीच्या आधारे तालुक्यातील (अवैध रित्या) दिवस रात्र चालणारी रेतीची वाहने (प्रसंगी जिव धाेक्यात टाकुन) पकडली !हे येथे उल्लेखनिय आहे.
दरम्यान काही महिण्यांपुर्वि तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार राजू धांडे व त्यांचे पथकाने येथील पठाण पुरा क्षेत्रात पाच ते सहा वाहने भल्या सकाळी तहसीलदार निलेश गाैंड यांचे मार्गदर्शना खाली पकडल्याचे वाचकांच्या स्मरणातच असेल.
तालुक्यातील रेती घाटांचा या वेळेस लिलाव झाला नसल्यामुळे अवैध रेती चाेरीचे प्रमाण माेठ्या प्रमाणात वाढले हाेते. परंतु तहसीलदार निलेश गाैंड तथा त्यांचे महसुल पथकांने (या तालुक्यात) केलेल्या धडक कारवायां मुळे (अवैध रेतीचे) चाेरीचे प्रमाण काही अंशी कमी झाले आहे हे मात्र तेवढेच खरे आहे.