येत्या सोमवारी एम.ई.एल. कंपनी समोर यंग चांदा ब्रिगेडच्या स्टील कामगार युनियनचे आंदोलन !

0
240
  1. येत्या सोमवारी एम.ई.एल. कंपनी समोर यंग चांदा ब्रिगेडच्या स्टील कामगार युनियनचे आंदोलन !

🔶💠🟩चंद्रपूर🟪💠🟩🔶🟣किरण घाटे🔶💠
एम.ई.एल. अंतर्गत कार्यरत सुरक्षा रक्षक व कामगारांच्या विविध मागण्यांना घेऊन सोमवारी ८ फेब्रुवारीला यंग चांदा ब्रिगेडच्या स्टील कामगार युनियनच्या वतीने एम.ई.एल. समोर एक दिवसीय लक्षणीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.💠🟩🟣🟪 या आंदोलनात कामगारांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहणार आहे.
चंद्रपूर येथील फेरो अलॉय कंपणीत कार्यरत १२१ सुरक्षा रक्षक हे कंत्राटी पध्दतीवर कार्यरत आहे. आता या सुरक्षा रक्षकांना चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळा मार्फत नोंदनिकृत करण्यात येणार आहे. सदर प्रक्रिया सुरुही झाली आहे. 🟩🟧💠🔶🟪या प्रक्रियेत अनेक सुरक्षा रक्षकांना जाणीवपूर्वक शारिरीक व वैद्यकीय तपासणीत अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यामूळे मागील अनेक वर्षापासून येथे कार्यरत या सुरक्षा रक्षकांवर बेरोजगारीचे संकट ओढावले आहे. हि बाब अन्याय कारक असून येथील १२१ सुरक्षा रक्षकांना चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामार्फत नोंदनिकृत करून पूर्ववत कामावर घेण्यात यावे या प्रमूख मागणीसह येथील कामगारांवर होणा-या अन्याया विरोधात तसेच इतर मागण्यांसाठी सदर आंदोलन करण्यात येणार आहे. 🔶💠🟩🟪 आंदोलनात कामगार तसेच सुरक्षा रक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन यंग चांदा ब्रिगेडच्या स्टील कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here