चंद्रपूर जिल्हा बँकेकडून शेतकरी कल्याण निधी चे वाटप

0
522

चंद्रपूर जिल्हा बँकेकडून शेतकरी कल्याण निधी चे वाटप

कोठारी, राज जुनघरे : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा कोठारी तर्फे सेवा सहकारी संस्था कळमना चे किडनी आजार ग्रस्त शेतकरी दशरथ लटारी परेकर यांना शेतकरी कल्याण योजना निधी अंतर्गत आर्थिक मदतीचा धनादेश रूपये चाळीस हजार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर चे बल्लारपूर तालुक्याचे संचालक डॉ. अनील वाढ ई यांच्या हस्ते शाखा बल्लारपूर येथे करोनाचे काटेकोर नियम पाळुन छोटेखानी कार्यक्रमात वितरण करण्यात आला. सेवा सहकारी संस्था कळमना चे सहकार्याने व संचालक डॉ. अनिल वाढई यांचे शिफारशी ने जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांचे मंजुरीने किडनी ग्रस्त शेतकरी सभासदाचे व शेतकऱ्यां प्रती सामाजिक बांधिलकी जपुन आर्थिक मदत करण्यात आली. तसेच ओम श्री अम्मा भगवान महिला बचत गट बल्लारपूर यांना व्यवसायासाठी बल्लारपूर शाखे अंतर्गत रूपये तिन लाखांचा धनादेश बचत गटाचे अध्यक्ष व सचिव यांना प्रदान करण्यात आला. सदर कार्यक्रमास कळमना संस्थेचे अध्यक्ष विनोद उरकुडे, सचिव एम. व्हि. सायसे, कोठारी शाखेचे शाखाधिकारी सुधाकर चौथले, बल्लारपूर शाखेचे शाखाधिकारी सुधिर वानखेडे, निरिक्षक अशोक पवार, दहेली संस्थेचे अध्यक्ष नागोबा राजुरकर, बांमणी संस्थेचे अध्यक्ष नलिनी साळवे, दहेली व बांमणीचे सचीव दिनेश शेरकी, प्रविण शेरकी, महिला बचत गट सुपरवाईझर ममता चौधरी, कल्पेश्वरी भसारकर आदिची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here