भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुस तर्फे अशोक विजयादशमी साजरी

0
713

भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुस तर्फे अशोक विजयादशमी साजरी

 

दि. 5 आक्टोंबर 2022 रोजी भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुस च्या वतीने 66 वा धम्मचक्र प्रवर्तन व अशोका विजया दशमी दिना निमित्त पंचशील चौक समता वाचनालय येथे कार्यक्रम साजरा करण्यात आला.

समता वाचनालय इथुन सकाळी 10 वाजता बौद्ध उपासक उपासिका यांनी रॅली काडुन नगर परिषद घुग्घुस येथे प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सामुहिक बुद्ध वंदनाचा कार्यक्रम घेऊन ही रॅली परत पंचशील चौक येथे नेण्यात आली.

नंतर पंचशील चौक समता वाचनालय घुग्घुस येथे भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुसचे अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव यांचा अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला.

तथागत भगवान बुद्ध, चक्रवर्ती सम्राट अशोक, महात्मा फुले, प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पंचशील ध्वजारोहण करुन सामुहिक बुद्ध वंदना घेण्यात आली.

यावेळेस नवनिर्माण विहार वास्तु बांधकामासाठी हेमंत आनंदराव पाझारे यांनी आपल्या वडिलाचा वर्षाचा कार्यक्रम न करता त्यांनी विहार बांधकाम करिता 25 हजार रुपये दान दिले, तसेच सुधाकर वनकर यांच्या परिवारा तर्फे सुध्दा 5 हजार रुपयांचे विहार बांधकाम करण्यासाठी दान दिले.

भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुसचे अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव यांनी आखलेली संकल्पनेला थोडी थोडी वाचा फुटत आहे.

त्यानंतर घुग्घुस येथील सर्व बौद्ध विहाराचे आगमन पंचशील चौक समता वाचनालय घुग्घुस इथे झाले.

पंचशील चौक येथुन सर्व रॅली ही भगवान बुद्ध प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोष करत रॅली गांधी चौक, बँक ऑफ इंडिया, व नवबौद्ध स्मारक समिती येथे जुनी तहसील कार्यालय येथे भगवान बुद्ध प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सामुहिक बुद्ध वंदना घेऊन हा कार्यक्रम शांतताने पार पाडण्यात आला.

यावेळेस भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुस अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव, डॉ. सौरब सोनटक्के, रमाबाई सातारडे उपाध्यक्ष, चंद्रगुप्त घागरगुंडे कार्याध्यक्ष, भावनाताई कांबळे सचिव, हेमंत आनंदराव पाझारे विहार बांधकाम कोषाध्यक्ष, आशिष रमेश परेकर कोषाध्यक्ष, शरद पाईकराव विहार निर्माण, जय भीम युवा मंच, सारिपुत्त बौद्ध विहार अध्यक्ष अल्काताई चुनारकर, आमरपाली बौद्ध विहार अध्यक्ष अशोक रामटेके तक्षशीला जनजागृती महीला मंडळ चे अध्यक्ष सरोजताई पाझारे आदी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here