महात्मा ज्योतिबा फुले यांचे जीवन सर्वांसाठी प्रेरणादायी- डॉ उमेश तुळसकर

0
326

महात्मा ज्योतिबा फुले यांचे जीवन सर्वांसाठी प्रेरणादायी- डॉ उमेश तुळसकर

अनंता वायसे

मातोश्री आशाताई कुणावार कला वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय व विद्या विकास कनिष्ठ महाविद्यालय हिंगणघाट यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक २८/११/२०२० ला महात्मा फुले पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ उमेश तुळसकर तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य नितेश रोडे विद्या विकास कनिष्ठ महाविद्यालय हिंगणघाट यांची उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली, प्रसंगी नितेश रोडे यांनी महात्मा फुले यांच्या कार्यावर प्रकाश टाकला तर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ उमेश तुळसकर यांनी महात्मा फुले यांचे संघर्षमय जीवन सर्वांसाठी प्रेरणादायी असल्यामुळे सर्वांनी त्यांचा आदर्श समोर ठेवून कार्यरत राहावे असे मत मांडले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा प्रेरणा गलांडे तर आभार प्रा भाग्यश्री साबळे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कला वाणिज्य व विज्ञान शाखेतील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here