सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियोजन शून्यतेने भारोसा ते इरई रस्ता अपूर्ण

0
506

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियोजन शून्यतेने भारोसा ते इरई रस्ता अपूर्ण

कोरपणा/प्रतिनिधी : सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक १ चंद्रपूर अंतर्गत खनिज निधीतून काम मंजूर झालं होतं ८० लाख रुपये निधीतून मंजूर तालुक्यातील गट ग्रामपंचायत भारोसा अंतर्गत येत असलेला भारोसा ते इरई या अपूर्ण रस्त्या मुळे ग्रामवासीयांना नाहक त्रास सहन करून प्रवास कराव लागत आहे. इरई ते भारोसा हा रस्ता २.७० किलोमीटर असून या रस्त्याचे काम फक्त १ किलोमीटर पूर्ण होऊन बाकीचा रस्ता १.७० किमी अजून पर्यंत अपूर्ण आहे.
रस्त्यात चिखल की चिखलात रस्ता असे अनेक प्रश्न ग्रामवासीयांना भेडसावत आहे. ग्रामपंचायत तसेच तलाठी कार्यालयात काम आल्यास या रस्त्याने जाव लागते. गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही फक्त इयत्ता ५ वर्गापर्यंत असून पुढील शिक्षण घेण्यासाठी या रस्त्यानी गावातील मुलांना भारोसा येथे इयत्ता ८ वि पर्यंत शिक्षण घेऊन पुढील शिक्षणासाठी चंद्रपूरलाच जावे लागते. परंतु या रस्त्याच्या परस्थितीने नाहक त्रास सहन करत चिखल तुडवत शाळा व ग्रामपंचायतीचे काम विधार्था व ग्रामवासीयांना कराव लागते आहे. तरी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांनी या रस्त्याकडे लक्ष द्यावे ही आग्रहाची विनंती इरई ग्रामवासियांनी प्रशासनाला केली आहे.
या मार्गाची दुर्दैवी परिस्थिती होत असल्यामुळे येथील स्थानिक लोकांना येणे-जाणे साठी त्रास सहन करुन प्रवास करावा लागत आहे. अपूर्ण कामामुळे वाहतूक करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. या रस्त्याची समस्या लवकर दूर करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here