अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे थकित वेतन, थकित भविष्य निधी व ग्राजुटी देण्यात आली नसल्याने संबंधित संस्थेवर कारवाई करा!

0
486

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार उदय सावंत हे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर आले असता त्यांची भेट घेऊन सारथी असोसिएशन महाराष्ट्र राज्य, चंद्रपूर या अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने केली मागणी.

 

 

 

बल्लारपूर, (तालुका प्रतिनिधी) राज जुनघरे

 

शासनाच्या नियमांची पायमल्ली करीत नागपूर विभागा अंतर्गत येणाऱ्या अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन शिक्षन संस्था नी मागिल कित्येक वर्षांपासून सर्व अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांचे थकित वेतन व इतर निधी आज पर्यंत दिलेला नाही. या संबंधित मागण्यांचे संबंधित विभागांना अनेकदा देवूनही कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. यापुर्वीही उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाकडे शासन आपल्या दारी या कार्यक्रमात गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भात वेतन, ग्राजूटी, भविष्य निधी मिळत नसल्याची तक्रार केली होती. यावेळी बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी BIT बामणी, बल्लारपूर या संस्थेला उपकुलसचिव गोंडवाना विद्यापीठ यांनी सक्त ताकीद दिली होती. मात्र पाणी कुठे मुरले करायला मार्ग नाही. संबंधित विदयापिठाने कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही. याच संस्थेत कार्यरत कर्मचारी देवेंद्र सायसे यांनी थकित वेतना बाबत आवाज उठविण्याचा प्रयत्न केला असता त्यांना कायमचे सेवेतून बेदखल करण्यात आले. तसेच साई अभियांत्रिकी लोणारा, भद्रावती येथिल प्रा. आशिष मिलमिले यांना सुध्दा न्याय हक्कासाठी लढा देत असताना सेवेतून बंडतरफ करण्यात आले. न्याय हक्कासाठी लढत असल्याने कर्मचाऱ्यांवर आकस्मिक कारवाई केली जात आहे. असा आरोप देवेंद्र सायसे यांनी केला आहे. नौकरी नाही की रोजगार नाही.अशा अवस्थेत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी थकित वेतन व इतर मागण्या साठी लढा देत मरण यातणा भोगत आहेत. तेव्हा संबंधित संस्थांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नामदार उदय सावंत यांना निवेदना द्वारे सारथी असोसिएशन, चंद्रपूर ने केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here