घुग्घूस शहर काँग्रेस तर्फे हाथ से हाथ जोडो अभियान बैठक संपन्न

81

घुग्घूस शहर काँग्रेस तर्फे हाथ से हाथ जोडो अभियान बैठक संपन्न

काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या संकल्पनेतुन व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री विजय वड्डेटीवार, खासदार बाळू धानोरकर ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या आदेशानुसार घुग्घुस जनसंपर्क कार्यलयात शहर अध्यक्ष राजुरेड्डी यांच्यावतीने हात से हात जोडो अभियान आढावा बैठक घेण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे व प्रमुख अतिथी श्यामराव थेरे हे होते.

कार्यकर्त्यांना हात से हात जोडो अभियानाची भूमिका समजावून सांगताना देवतळे यांनी मोदी शासनावर कडक ताशेरे ओढले. देशात लोकशाही संपविण्याचा कट कारस्थान मोदी शासन करत असून राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेच्या यशाने भाजप भयभीत असून संसदेत अडाणीला घेऊन गांधी यांनी पंतप्रधानांना विचारलेल्या प्रश्नांने मोदी यांची गोची झाली म्हणूनच राहुल गांधी यांच्या विरोधात कट कारस्थान करून त्यांचे संसदेतील सदस्यपद रद्द करण्यात आले आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लाखो भूमिपुत्रांनी आपल्या प्राणाची आहुती देत देशाला स्वातंत्र्य प्राप्त करून दिले. आज त्या स्वातंत्र्यला संपुष्टात आणण्याचा कुटील डाव मोदी शासन करीत असून देशाच्या प्रत्येक नागरिकांना या हुकूमशाही विरोधात आवाज उठविण्याची गरज रेड्डी यांनी व्यक्त केली.

आढावा बैठकीत तालुकाध्यक्ष श्यामकांत थेरे,किसान जिल्हाध्यक्ष रोशन पचारे,माजी जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती पवन आगदारी,ज्येष्ठ नेते शामराव बोबडे, किशोर बोबडे, सुधाकर बांदूरकर,अनिरुद्ध आवळे,अजय पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कामगार नेते सैय्यद अनवर, सूत्र संचालन देव भंडारी, व आभार प्रदर्शन ताज अस्लम यांनी केले.

कार्यक्रमात युवक काँग्रेस नेते सुरज कन्नूर, युवक अध्यक्ष तौफिक शेख, उत्तर भारतीय मोर्चा सचिव ब्रिजेश सिंह,अलीम शेख,मोसीम शेख,भैया भाई, रोशन दंतलवार,रोहित डाकूर, अनुप भंडारी,सुकुमार गुंडेटी,स्टिवन गुंडेटी,तिरुपती महाकाली, थॉमस अर्नाकोंडा,नुरुल सिद्दीकी,देव भंडारी,रमेश रुद्रारप, सुनील पाटील,बालकिशन कुळसंगे,शहजाद शेख,सिनू गुडला, विजय माटला,कुमार रुद्रारप,रफिक शेख,अरविंद चहांदे, आकाश चिलका,हरीश कांबळे, दीपक पेंदोर,अमित सावरकर, सचिन नागपुरे,अंकुश सपाटे,कपिल गोगला, रंजित राखुंडे, अजय त्रिवेणी, सौ. संगिता बोबडे,सौ.पद्मा त्रिवेणी, सौ.पुष्पा नक्षीने, संध्या मंडल,दुर्गा पाटील,सरस्वती कोवे, सौ.मंगला बुरांडे, व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

advt