शिक्षकाकडून संविधान व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान……. कार्यवाही साठी सावली पोलिसांना दिले निवेदन

0
495

शिक्षकाकडून संविधान व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान……. कार्यवाही साठी सावली पोलिसांना दिले निवेदन

सावली ( बंडू मेश्राम )


सावली तालुक्यातील बहुजन संघटना यांच्या वतीने पोलिस प्रशासन सावली यांना’ झाडीपठ्ठी नाटक गायक संतोषकुमार पेशा मास्तर या समाजकंटका कडून बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापुरुषा बद्दल अपशब्द वापरले,त्यांच्यावर कार्यवाही साठी निवेदन देण्यात आले आहे.
सद्या सोशल मीडिया फेसबुक,व्हाटसॅअप यांच्या माध्यमातून संतोषकुमार नवेगाव बुज ता‌. मुल जि. चंद्रपूर या अज्ञात व्यक्तीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपशब्द वापरले आहेत व तो मेसेज सद्या झपाट्याने वायरल होत आहे.जाणून बुजून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रेमी या देशातील तमाम जनतेच्या भावना दुखावण्याच्या हेतूने हा प्रकार केला असल्याचे आंबेडकरी चळवळीतील जनतेचे मत आहे.
तरी या व्यक्तीवर कडक कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी मा. मुक्कद्दर मेश्राम बहुजन समाज पार्टी जिल्हा अध्यक्ष , पुर्णचंद्र गेडाम , चेतन रामटेके वंचित आघाडी तालुकाध्यक्ष , बंडू मेश्राम ऑल इंडिया पॅंथर सेना तालुका अध्यक्ष, प्रमोद गेडाम महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सावली तालुका अध्यक्ष , अंतबोध बोरकर , मुकेश दुधे, स्नेहदीप वाळके , दिलीप निमगडे , नलिनी वासाटे सामाजिक कार्यकत्या बसपा आदी तालुक्यातील अनेक सामाजिक संस्था चे पदाधिकारी व कार्यकर्ते व अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि सावली पोलिस उपनिरीक्षक कुमारसिंग राठोड यांना सावली तालुक्याच्या वतीने निवेदन देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here