लोडर चा मुलगा लोडर तर कंपनी कामगाराचा मुलगा कंपनी कामगार का नाही..

410

लोडर चा मुलगा लोडर तर कंपनी कामगाराचा मुलगा कंपनी कामगार का नाही..

अल्ट्राटेक कंपनीतील निवृत्त कामगारांचा संतप्त सवाल…

नांदा फाटा :- एकीकडे शासन अनुकंप तत्वावर बंदी आणताना दिसून येत आहे तर दुसरी कडे मात्र प्रायव्हेट कंपनी याला दुजोरा देत असल्याचे निदर्शनास येत आहे. नुकतीच अल्ट्राटेक कंपनी प्रशनानात कार्यरत लोडर कामगाराचा मुलगा लोडर मध्ये सामावून घ्यावा असा आदेश काढत भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. परंतू याच कंपनीतील कंपनी कामगार चा मुलांना करायचं तरी काय त्यामुळे लोडर चा मुलगा लोडर तर कंपनी कामगाराचा मुलगा कंपनी कामगार का नाही.? असा संतप्त सवाल निवृत्त कंपनी कामगार करू लागले आहे.

सविस्तर वृत्त असे की, अल्ट्राटेक कंपनीला कर्यरत कर्मचारी याची वयोमर्यादा झाल्याने आता दरवर्षी कामगार निवृत्त होत आहे. या वर्षी जुलै महिन्यात जवळपास ७० कामगार निवृत्त होत असल्याने कामागर भरती राबविण्यासाठी फॉर्म मागविण्यात आले होते. त्यात ६० लोडर कामगार घ्यायचे हे कंपनी प्रशासनाने ठरविले. काम मिळेल या उद्देशाने परिसरतील व दत्तक गावातली जवळपास २५०० दोन हजार पाचशे युवकानी कागदो पत्राची जुळवा जुळव करून फॉर्म भरले. त्यात लोडर मध्ये काम करणारे, मयत असल्लेल्या कामगाराचा मुलांना कामावर घायचे असे प्राधान्य देत. आदेश वेळोवेळी तीनदा बदलविण्यात आला. ३० मुलाची भरती प्रक्रिया पार पडली त्यात ठेकेदारी आणि लोडर काम करणारे व इतर असे व्यक्ती घेण्यात आले. परंतू आता पुन्हा ३० युवक घेण्यात आले त्यात निकषात न बसणारे सुध्दा घेण्यात आल्याने गोधळ माजल्याचे दिसून येत आहे. लोडर कामगार चा मुलांना लोडर मध्ये घेतल्या जात आहे तर कंपनी कामगाराचा मुलांनी कोणता गुन्हा केला त्याचे मुल सुध्दा उच्च शिक्षित असून बेरोजगार असल्याने आता कंपनी कामगार मुलांना सुध्दा कंपनी कामावर घ्या असा संतप्त निवृत्त कंपनी कामगार यांचा सुर उमटू लागला आहे.

कंपनी मध्ये माझी शेती गेली तेव्हा मी नोकरीवर लागलो.आता नी निवृत्त झालो पेन्शन सुध्दा दोन हजार मिळते त्यात किराणा सुधा येत नाही. माझे मुल सुध्दा उच्च शिक्षित आहे. लोडर चा मुलांना ज्या प्रमाणे लोडर मध्ये सामावून घेत आहे. त्याच प्रमाणे कंपनी कामगाराचा मुलांना देखील कंपनी कामगार म्हणून सामावून घ्यावे. अन्यथा आम्हालाही आंदोलनाचा पवित्रा स्वीकारावा लागेल.अशी प्रतिक्रिया नाव न टाकण्याचा अटीवर निवृत्त कामगार यांनी दिली.

नुकत्याच झालेल्या भरती प्रक्रियेत जवळपास 25 ते 30 युवकांकडून 3 ते 5 लाख रुपयाप्रमाणे वसुली करण्यात आली असल्याची खात्री लायक माहिती आहे. पैसे घेणाऱ्यांनी नोकरीवर न लागलेल्या युवकांना नव्याने पुन्हा जागा निघणार असून त्यात सामावून घेण्याचे आश्वासन दिल्याने हा आर्थिक घोळ ही पुढे समोर येत आहे. तर अल्ट्राटेक लोडर मध्ये नियुक्त होण्या करिता एका व्यक्तीने ऑनलाईन पैसे दिल्याची माहिती समोर येत आहे.

विशेष म्हणजे लोडर भरती प्रक्रिया राबविण्यात आली त्यात एकाच घरची दोन व्यक्ती सुध्दा घेण्यात आल्याचे निदर्शनास येत असून त्याचा नातेवाईक यांना पण लोडर मध्ये सामावून घेतल्याचे समोर येत आहे.

advt