वाघाला जेरबंद न केल्यास संतप्त शेतकरी व शेतमजुरांचा धरणे आंदोलनाचा इशारा

0
657

वाघाला जेरबंद न केल्यास संतप्त शेतकरी व शेतमजुरांचा धरणे आंदोलनाचा इशारा

माजी आमदार सुदर्शन निमकर यांची शिष्टमंडळाने घेतली भेट

राजुरा : विरुर स्टे. वनपरिक्षेत्रातील नरभक्षी वाघाला तातडीने जेरबंद न केल्यास 5 सप्टेंबर रोजी तालुक्यातील संतप्त शेतकरी शेतमजुरांच्या वतीने उप विभागीय अधिकारी यांच्या कार्यालया समोर दु.12 ते सायंकाळी 4 पर्यंत धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

राजुरा तालुक्यातील विरुर वनपरिक्षेत्र व राजुरा वनपरिक्षेत्रात पट्टेदार वाघाने 8 निष्पाप शेतकरी-शेतमजुरांचा जीव घेतला असून 5 व्यक्ती हल्ल्यातून बचावले पण गंभीर जखमी झाले. नुकतेच दि.18.08.2020 ला पोळा या सणाच्या दिवशी नवेगाव येथील शेतकरी वासुदेव कोंडेकर याला ठार मारले व त्याच दिवशी कवीटपेठ येथील शेतकरी शांताराम बोभाटे याच्या वर हमला केला असता सोबत असलेल्या सोबत्यांनी आरडा ओरड केल्यामुळे तो बचावला. या परिसतातील शेतकरी भयभीत झाले असून दहशीत आहे. आता या परिसरातील शेतकऱ्यांनी सुध्दा संघटित होऊन या नारभक्षी वाघाला त्वरित जेरबंद करा किंवा जेरबंद होत नसेल तर ठार मारण्याची मागणी उप विभागीय अधिकारी राजुरा यांच्या मार्फतीने राज्याचे वन मंत्री संजय राठोड व सर्व संबंधिताना निवेदनाद्वारे दि.20.08.2020 रोजी केली आहे.

दि.05.08.2020 च्या आत या वाघाला जेरबंद न केल्यास 5 सप्टेंबर रोजी उपविभागीय अधिकारी राजुरा यांच्या कार्यालया पुढे धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनाला मार्गदर्शन करण्या करता माजी आमदार सुदर्शन निमकर यांची शिष्ठमंडळाने भेट घेतली. शिष्टमंडळात शंकर धनवलकर, नथु पा. बोभाटे, माधव बोभाटे, शांताराम बोभाटे, प्रभाकर कडुकर, कैलास मडावी, विश्वेश्वर जीवतोडे, सुशील धोटे, राजू बोभाटे, आनंदराव देठे, शंकर सोयाम इत्यादी उपस्थित होते. माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्यासोबत झालेल्या चर्चेत दि.5 सप्टेंबर रोजी तालुक्यातील शेतकरी शेतमजुरांच्या वतीने उप विभागीय अधिकारी यांच्या कार्यालया समोर दु.12 ते सायंकाळी 4 पर्यंत धरणे आंदोलन करण्याचे ठरविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here