गडचांदूर येथे प्रभाग क्र.१ मध्ये प्रतिबंधित क्षेत्रातील रहिवाशी जनतेला किट वाटून केले सहकार्य

0
364

गडचांदूर येथे प्रभाग क्र.१ मध्ये प्रतिबंधित क्षेत्रातील रहिवाशी जनतेला किट वाटून केले सहकार्य

प्रतिनिधी प्रवीण मेश्राम

दि.13 ऑगस्ट ला कोरोना रुग्ण आढळून आले असता येथील काही भाग हा कोरोना प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला होता . त्यामुळे येथील नागरिकांना बाहेर ये- जा करण्यास सक्त मनाई करण्यात आले होते. संबंधित क्षेत्रात एकूण 13 घरांचा समावेश असून येथील नागरिक मोलमजुरी करणारे असून या सर्वांचे कामधंदे ठप्प झाली होती. येथील नागरिक हातावर आणून पानावर खाणारे असल्याने उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे नगर परिषदचे उपनगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शरद जोगी आणि नगरसेविका तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला अध्यक्ष अश्विनी कांबळे यांनी येथील जनतेची परिस्थिती जाणून घेतली. एक हात मदतीचा म्हणून त्यांच्याकडून एकूण १३ कुटुंबांना धान्यांची किट वाटप करण्यात आले. याआधी सुध्दा उभयतांनी येथील जनतेला मास्क, सॅनिटाईजर व इतर वस्तूंचे वाटप केले होते अजूनही त्यांचे मदत करण्याचे कार्य सतत सुरूच आहे
सदर सत्कार्यात करण सिंग, ज्ञानेश्वर अवताडे, संत्वन सिंग, राज सलाम,भोगेकर मॅडम, सुभे मॅडम, चिकणकर मॅडम, आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●
सामाजिक कार्यात सदैव तत्पर असणारे समाजसेवक म्हणून परिचित असलेले माजी उपनगराध्यक्ष सचिन भोयर यांनी सुद्धा मौलाचे योगदान देऊन प्रतिबंधात्मक क्षेत्रात अडकलेल्या कुटुंबियांना राशन पुरविण्यात आले.
◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆
काँग्रेस पक्षातर्फे दि .१८ ऑगस्ट ला प्रतिबंधित क्षेत्रातील जनतेला गडचांदूर न.प.अध्यक्षा सविता टेकाम, आरोग्य सभापती जयश्री ताकसांडे, प्रभाग क्र 1चे नगरसेविका अर्चना वांढरे यांनीही मदतीचा हात समोर करून पोळा या शुभ दिनी येथील कुटुंबियांना गोड पदार्थ आणि भाजीपाला देण्यात आले.
सर्व समाज कार्य करणाऱ्या मान्यवरांचे जनतेने मनःपूर्वक आभार मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here