कोठारीत दुर्गा मंडळाच्या वतीने रक्तदान

0
585

कोठारीत दुर्गा मंडळाच्या वतीने रक्तदान

 

 

राज जुनघरे
बल्लारपूर : स्थानिक जय बाल दुर्गा मंडळ, रक्तकेंद्र जिल्हा सामान्य रुग्णालय, तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्रीच्या निमित्ताने ठानेदार तुषार चव्हाण व सरपंच मोरेश्वर लोहे यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
नुकतेच नवरात्र महोत्सवास उत्साहात सुरुवात झाली आहे. दुर्गा मंडळाच्या देखाव्याने मंडप सजले आहेत. अशातच कोठारी येथील तरुण जय बाल दुर्गा मंडळाच्या वतीने रक्तदान हेच जीवन दान हा संकल्प अंगीकृत करीत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराचे दरम्यान २७ रक्तदात्यांनी रक्तदान करुन आपली सामाजिक बांधिलकी जोपासली. यावेळी रक्तकेंद्र, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. पंकज पवार, उत्तम सावंत, अर्पणा रामटेके, राम वागोली, साहिल भसारकर, अभिजित पोफडे उपस्थित होते. सदर रक्तदान शिबिरा साठी बाल दुर्गा मंडळाचे अध्यक्ष आकाश मोरे, उपाध्यक्ष सौरभ ढवस, सचिव अश्विन विरुटकर व गणेश इजगीरवार, प्रफुल वांढरे, अमित मोरे, अनिकेत टेकाम, सागर कंदिकटीवार, वतन डेहाने, विक्रम टेकाम, करण ढवस, दिगांबर कोवे, प्रकाश लोहे, अमरजित सोनी, अनिल ढवस, गणेश ताजणे, प्रितेष तपासे, अजय कंदिकटीवार, यश लोहे यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here