रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू, राजुरा वनपरिक्षेत्रातील घटना

260

रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू, राजुरा वनपरिक्षेत्रातील घटना

राजुरा, 21 ऑक्टो. : राजुरा वनपरिक्षेत्रातील चुनाळा येथील कक्ष क्रमांक 158 दक्षिण मध्य रेल्वे पोल क्रमांक 144/31 अपलाईन मार्गावरील रेल्वे ट्रॅकवर आज सकाळी 7:45 च्या सुमारास वाघाचा मृतदेह असल्याची माहिती समोर आली. हि माहिती वनविभागाला कळताच वनाधिकाऱ्यासह वनविभागाची चमू घटनास्थळी दाखल झाली. सदरची घटना रेल्वेच्या धडकेने पहाटेला घडली असून अंदाजे 2 ते 3 वय वर्ष नर वाघ असल्याची माहिती वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी दिली.

घटनास्थळावर वनपरिक्षेत्र राजुरा येथील वनाधिकाऱ्यासह मध्य चांदा वनविभाग चंद्रपूरच्या श्वेता बोडू, राजुराचे उपविभागीय वनअधिकारी अमोल गर्कल, वनपरिक्षेत्र अधिकारी राजुरा चे एस. डी. येलकेवाड, NTCA चे प्रतिनिधी बंडू धोत्रे, PCCF WildLife चे प्रतिनिधी मुकेश भांदककर, पशुधन विकास अधिकारी डॉ. नरसिंग तेलंगे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पि. के. जेल्लेवार, डॉ. कुंदन पोडचेलवार, क्षेत्र सहायक पि. आर. मत्ते आदी घटनास्थळावर उपस्थित होते.

याबाबत वनगुन्हा नोंदवून सदर मृत वाघाचा शासकीय नियमाप्रमाणे घटनास्थळाचा पंचनामा व शवविच्छेदन करून दहन करण्यात आले. या संदर्भात पुढील कार्यवाही मध्य चांदा वामविभाग चंद्रपूर चे उपवनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

advt