बल्लारपूर- राजुरा मार्गावरील वर्धा नदीच्या पुलावर टू व्हिलर व कारची जबर धडक

0
1307

बल्लारपूर- राजुरा मार्गावरील वर्धा नदीच्या पुलावर टू व्हिलर व कारची जबर धडक

राजु झाडे

राजुरा:- बल्लारपूर राजुरा मार्गावरील वर्धा नदीच्या पुलावर आज सकाळी 9 वाजताच्या दरम्यान टू व्हीलर आणि कार याची जबर धडक झाली. बल्लारपूरकडे जाणाऱ्या कार MH34 -BR5982 ला राजुरा कडे येणाऱ्या टू व्हीलर स्प्लेनडरने जबर अशी धडक दिली असून या अपघातात टू व्हिलर चालकाचा पाय मोडल्या गेला. त्यांना जिल्हा रुग्णायल चंद्रपूर येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे.
जखमी व्यक्ती अज्ञात असून टू- व्हीलरने जण सवारी करत जात होते. दोन्हीं वाहनाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. पुलाच्या कठड्यावरील असलेल्या रोधकामुळे टू-व्हीलर वरील दोन्हीं जखमी पुलाखाली पडण्याचे वाचले असुन कसाबसा या रोधकामुळे त्यांचा जीव वाचला आहे. हे जखमी व्यक्ती कोण आहेत? याचा तपास चालू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here