नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात अशोक पवारांचे “बिराड”

0
1016

नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात अशोक पवारांचे “बिराड”

लेखक – अशोक लक्ष्मण पवार

 

बल्लारपूर (चंद्रपूर), राज जुनघरे : चंद्रपूर जिल्ह्यातील लेखकांच्या पंगतीत आपले स्थान निर्माण करणारे चंद्रपूरचे सुप्रसिद्ध कादंबरीकार, लेखक अशोक लक्ष्मण पवार यांच्या ” बिराड ” या आत्मकथनातील काही विशिष्ट भागाचा समावेश राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरच्या बि. काॅम.द्वितिय वर्षाच्या प्रथम सत्राच्या अभ्यासक्रमात या वर्षा पासून विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनासाठी करण्यात आलेला आहे.
जिल्याचे साहित्य विश्वातील वैभव अशोक लक्ष्मण पवार यांचा जन्म 1972 रोजी पाठीवर बिराड घेऊन फिरणाऱ्या व पालात वास्तव्य करून आयुष्य जगणाऱ्या कुटुंबात झाला. भटक्यांच्या पालात यानोली मुक्कामी ता. जिंतूर जिल्हा. परभणी येथे 4 था वर्ग पास करून वस्तीगृहात प्रवेश मिळविला, शालेय सुट्यांमध्ये रोज मजुरी केली, हाॅटेलात वेटरगीरीचे काम पतकरले. भटकंती ने आसुसलेल्या जिवनाला कलाटनी देण्यासाठी प्रथम श्रेणीत दहावी पास केली. पुढे पोटासाठी बाप्पासोबत बिराड घेऊनसतत भटकताना बालपण अतिशय हलाखीत गेले. नंतर बाह्य विद्यार्थी म्हणून एम.ए. पास केले आणि उपजीविकेसाठी चंद्रपूर येथील सिडीसीसी बॅंकेत नोकरी पत्करली. त्याच बरोबर त्यांनी साहीत्यात आपले वेगळेपण सिद्ध केले. आपल्या जिवनाचे बिराड आत्मकथनात मांडले. अशोक पवारांचे ‘ बिराड’, ‘ पडझड’, ‘ तसव्या’, ‘ दरकोस दरमजल ‘, ‘ इळनमाळ ‘, आदी गाजलेली पुस्तके असुन त्यांची पुस्तके महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात अंतर्भूत आहेत. वेगवेगळ्या विद्यापीठातुन त्यांच्या पुस्तकांवर बऱ्याच विद्यार्थ्यांनी एम. फिल . पी. एच.डी. मिळवून प्राविण्य प्राप्त केले आहे. पवार यांची ‘ भुईभेद ‘ कादंबरी मुंबई च्या संधीकाल प्रकाशना तर्फे परकाशीत होणार आहे. त्यांना साहित्य क्षेत्रात युवा संस्कृती साहित्य राष्ट्रीय पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार, व महाराष्ट्र फाउंडेशन चे पुरस्कारासह 43 साहित्य पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. नागपूर विद्यापीठाने निवड केलेल्या पाठात शिक्षणासाठी चा संघर्ष व भटक्या विमुक्तांचे जगणे रेखाटले आहे. तद्वतच त्यांच्या पाच पुस्तकांवर राज्यातल्या विचारवंतांनी सहा पुस्तके लिहिली आहेत. अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या भटक्यांच्या पालातला प्रवास नागपूर विद्यापीठा प्रयत्न पोहोचलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here