वणी पोलिसांनी केली बार चालकास बेदम मारहाण

0
820

वणी पोलिसांनी केली बार चालकास बेदम मारहाण

वणी (यवतमाळ), मनोज नवले

वणी वरोरा रस्त्यावरअसलेल्या एका बार चालकास पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कडे केली आहे. फिर्यादी मोरेश्वर उज्वलकर (52)असे मारहाण झालेल्या बार चालकचे नाव आहे. गुरवारचे रात्री 11 वाजता बार बंद करून घराजवळ शतपावली करत होते. जमादार विठ्ठल बुरेवार यांनी काहीही न विचारता उजवल्कर यांना मारण्यास सुरवात केली. का मारता विचारता असे विचारता पुन्हा मारले. जमादार विठ्ठल बुरेवार त्यांची तक्रार देण्यास पो. स्टेशन मध्ये गेलो असता मला अरवाच्य भाषेत शिवीगाळ करून पोलीस स्टेशन मधेही मारहाण केली व पहाटेच्या चार वाजेपर्यंत विनाकारण बसून ठेवले. त्यामुळे आपली समाजात बदनामी होत असल्याची तक्रार उज्वलकर यांनी केली आहे.मात्र संबंधित जमादारावर कार्यवाही करून मला व माझ्या परिवाराला न्याय द्यावा. अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कडे उज्वलकर यांनी केली आहे.

 

 

विठ्ठल बुरेवार हे नेहमी वादग्रस्त वागतात व स्वतःच्या पदाचा फायदा घेऊन नागरिकांना त्रास देतात. विनाकारण कोणालाही फसवतात, अश्या पोलिसावर कारवाई होणे आवश्यक आहे. अशा पोलिसामुळे जनतेत पोलिसांची प्रतिमा मलिन होते. आता पोलीस अधीक्षक कार्यवाही करतात की वादग्रस्त जमादार विठ्ठल बुरेवार यांना पाठीशी घालून उजवल्कर यांच्यावर अन्याय करतात का ? हा प्रश्न जनतेला पडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here