युवा संकल्प संस्थेची रोजगाराकडे वाटचाल

0
582

युवा संकल्प संस्थेची रोजगाराकडे वाटचाल

पं.स.सदस्या धर्मशिला सहारे तथा सरपंच कुंदाताई जुवारे यांच्या शुभहस्ते उद्घाटन सोहळा संपन्न

गडचिरोली : युवा संकल्प संस्था फक्त समाज सेवेसाठी मर्यादित नसून भविष्यात युवा पिढीसाठी रोजगार उपलब्ध करून देणारी संस्था आहे. आज युवा संकल्प संस्था संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात गावागावांमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवीत जनसामान्यांच्या हृदयापर्यंत पोहचलेली आहे. त्यात युवापिढीचा जास्तीत जास्त पाठिंबा मिळत आहे. त्यांच्यासाठी आज दिनांक 25/09/2021 पासून रोजगाराची सुरुवात करण्यासाठी युवा संकल्प इंटरनेट सर्विसेस म्हणून इंटरनेट कॅफेचे भेंडाळा येथे उद्घाटन सोहळा धर्मशिलाताई सहारे पं. स. सदस्य चामोर्शी तथा भेडांळाचे प्रथम नागरीक कुंदाताई जुवारे सरपंच ग्रा.पं.भेंडाळा यांच्या शुभहस्ते करण्यात आला. भविष्यामध्ये अशाच प्रकारे व्यवसाय सुरू करून रोजगार उपलब्ध करण्याचा संस्थेची आकांक्षा आहे. आजच्या शुभ प्रसंगी प्रमोदजी सहारे सामाजिक कार्यकर्ते, निखिलजी उंदिरवाडे ग्रा.पं.सदस्य भेंडाळा, जेष्ठ नागरिक/ सेवानिवृत्त आदर्श शिक्षक बारसागडे सर, संपूर्ण युवा संकल्प परिवार व गावकरी मंडळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here