भव्य मोफत रोगनिदान शिबीर संपन्न

0
409

भव्य मोफत रोगनिदान शिबीर संपन्न

विरुर स्टे./राजुरा, २५ नोव्हें. : काल पोलीस स्टेशन विरुर येथे पोलीस स्टेशन विरुर व उप पोलीस स्टेशन लाठी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत रोगनिदान शिबीर घेण्यात आले. शिबिराच्या कार्यक्रमाला अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विरुरचे ठाणेदार राहुल चव्हाण व लाठीचे ठाणेदार फाल्गुन घोडमारे हजर होते.

सदर रोगनिदान शिबिराला उपजिल्हा रुग्णालय राजुराचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. एल टी कुळमेथे, प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचोलीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय मुन, अशाधाम हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. एलिझाबेथ जोसेफ, उपजिल्हा रुग्णालय राजुराच्या स्त्री रोग तज्ञ तथा वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिता आरके, ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरीचे बालरोग तज्ञ तथा वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप बांबोळे व प्राथमिक आरोग्य केंद्र टोहोगावच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल डाहुले उपस्थित होते.

यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते पोलीस स्टेशन विरुर येथे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण मैदानाचे उदघाटन करण्यात आले. यात पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस भरती प्रशिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींनी सहभाग दर्शवला होता. या मोफत रोगनिदान शिबिरात १०१५ रुग्णांना उपचार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here