वेकोली कर्मचाऱ्याला रस्त्यात अडवून अज्ञात व्यक्तींकडून मारहाण

0
380

वेकोली कर्मचाऱ्याला रस्त्यात अडवून अज्ञात व्यक्तींकडून मारहाण

राजुरा / अमोल राऊत (26 ऑगस्ट)

सातरी गावालागत असलेल्या पाईप फॅक्टरी जवळ रस्त्यावर ऑटो चालकाशी वाद घालणाऱ्या अज्ञात इसमांनी गणेश नत्थु लडके (35) यांना शिवीगाळ करून अकारण मारहाण केल्याची घटना काल घडली.
सविस्तर वृत्त असे की, गणेश लडके वेकोली येथे नोकरीला असून जवाहर नगर राजुरा येथील रहिवासी आहेत. ते नेहमी प्रमाणे सायकीलिंग चा व्यायाम करून घरी जात असताना मोटरसायकल रस्त्यावर लावून ऑटो चालकाशी अज्ञात पाच सहा इसम वाद घालत होते. लडके यांनी मोटार सायकल रस्त्यावरून बाजूला घ्या असे त्यांना सांगितले असता त्यांनी शिवीगाळ केली. त्यातील अनिकेत सोमलकर नामक व्यक्तीने लडके यांच्यावर भिरकावला. तो दगड लडके यांच्या डोक्याला लागून त्यांना दुखापत झाली. रस्त्याने  येणारे राजुऱ्याचे नगरसेवक रमेश नळे यांनी गणेशला त्या गावगुंडांच्या तावडीतून सोडवले. अनिकेत सोमलकर सोबत विशाल तुमराम व इतर पाच ते सहा अज्ञात इसम होते.
दिवसा ढवळ्या राजुरा शहरालगत गावगुंडांची मुजोरी वाढली असून त्याकडे पोलीस प्रशासनाने गंभीरतेने लक्ष देऊन त्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. लडके यांनी राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला असून पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here