घुग्घुस शहरात रामनवमी उत्साहात, भक्तिमय वातावरणात प्रभु श्री रामाचा जयजयकार

0
72

घुग्घुस शहरात रामनवमी उत्साहात, भक्तिमय वातावरणात प्रभु श्री रामाचा जयजयकार

रामनवमीला घुग्घुस येथे भव्य शोभायात्रा (रॅली)

 

चैत्र नवरात्रीच्या समोरापावेळी,सर्व राजकीय पक्ष आणि धार्मिक संघटनांकडून बुधवार मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्री रामचंद्रजीच्या “जयंती” निमित्त भव्य मिरवणूक काढून रामनवमी साजरी करण्यात आली.या रॅलीत लोकांनी मोठी गर्दी केली आणि रामनवमीच्या मुहूर्तावर संपूर्ण घुग्घुस शहर भगवामय झाला.प्रत्येक चौक आणि रस्ते तोरण आणि रोषणाईने सजवले होते,रॅलीत लहान मुले आणि महिलाचांही मोठा सहभाग होता.

शोभायात्रेच्या रॅली मध्ये अनेक व सर्वधर्म समभाव समाज बांधव पक्षाने पाणीची बाटल,शरबत,आईस्क्रीम,अल्पोहार व महाप्रसाद व्यवस्था करण्यात आले.तसेच रॅलीत सहभाग झालेले भगव्या टोप्या,गमचे नाचत,गाजत, आतीषबाजी,जय श्रीरामच्या नावाने शहर गुंजले.

शहरातील रस्त्यांवरून हि मिरवणूक शहरातील प्रमुख चौकांवर आली,या रॅलीत पोलीस दलासह पोलीस अधिकारी उपस्थित होते.शांततेत पार पडलेल्या रॅलीत सहभागी झालेल्या नागरिकांचे राजकीय पक्ष आणि धार्मिक संघटनांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here