प्रहार च्या एका फोन वर एका दिवसात लावला ट्रांसफार्मर
प्रहार चे बिडकर यांनी ठेकेदाराला व अधिकाऱ्याला घेतले धारेवर

प्रवीण मेश्राम
गडचांदूर : गडचांदूर येथील शेतकरी यांची शेती पिंपळगाव येथे आहे शेतात वीज घेण्यासाठी 2017 मध्ये डिमांड भरले आणि 2019 च्या आखरी आखरी वीज मिळाली जे ट्रँसफार्मर लावले त्यात काही महिन्यातच बिघाड आली याची तक्रार शेतकर्याने वीज वितरण कार्यालयात तक्रार दाखल केली चार महिने झाले तरी शेतकऱ्याला उद्या लावतो आठ दिवसांनी लावतो असं सांगून वेळ मारून नेली शेवटी त्या शेतकऱ्याने प्रहार जनसम्पर्क कार्यालय येथे तक्रार दिली प्रहार चे सतिश बिडकर यांनी ठेकेदारांची चांगलीच कांन उघाडणी केली त्यांनी सर्व खापर वीज वितरण अधिकाऱ्यावर टाकले तर अधिकाऱ्याला सम्पर्क केला असता त्यांनी उलट ठेकेदारवर व पावसाचे निमित्य सागीतले बिडकर यांनी येत्या गुरुवार पर्यन्त ट्रांसफार्मर लागले पाहिजे असा दम अधिकारीव ठेकेदाराला दिला प्रहार तालुका अध्यक्ष बिडकर यांच्या एका फोन वर दुसर्यादिवशीच ट्रांसफार्मर लावून दिले त्या शेतकऱ्याने प्रहार चे आभार मानले त्याच्या चेहऱ्यावर आनंद आनंद होता चार महिन्याचे काम एका दिवसात प्रहार ने करून दिले असे तो शेतकरी बोलला.