पोक्सो सह विनयभंगाचा गुन्हा दाखल ; यवतमाळ जिल्ह्यातील घटना

0
640

पोक्सो सह विनयभंगाचा गुन्हा दाखल ; यवतमाळ जिल्ह्यातील घटना

 

वणी (यवतमाळ), मनोज नवले : मारेगाव तालुक्यातील हिवरी येथील घटना 26 वर्षीय युवकाने एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील हिवरी येथे घडली. ईश्वर कवडु आस्वले (26) रा. हिवरी असे नराधम आरोपीचे नाव आहे.

 

 

प्राप्त माहिती नुसार पीडित ही 13 ऑगस्ट रोजी 8 वाजता दरम्यान किराणा दुकानात सामान घेण्याकरिता जात होती. दरम्यान आरोपी ईश्वर यांनी रात्री अंधाराचा फायदा घेत पिडीतीच्या मागुन आला. लाईट बंद असल्याने अंधाराचा फ़ायदा घेत पिडीतीचे तोंड दाबले. उचलून रामा डवरे यांच्या बैलाच्या गोठ्यात नेले. दरम्यान पिडीतीने विरोध करत आरडा ओरडा करत आरोपीच्या हाताला झटका मारला व मोठं मोठ्यांनी ओरडू लागली. दरम्यान पिडीतेच्या वडीला सह घर शेजारी ग्रामस्थांनी घटना स्थळ गाठले. तेव्हा आरोपी ईश्वर हा गोठ्यातील तुराठीची झांजी वाकवून पसार झाला.

 

 

घटनेच्या दिवशी रात्र झाल्याने तसेच मारेगाव येथे येण्यासाठी वाहन न मिळाल्याने पिडीतीच्या वडिलांनी दुसऱ्या दिवशी 14 ऑगस्ट रोजी 11 वाजता थेट पोलीस स्टेशन गाठून आरोपी विरोधात रिपोर्ट दिला असता पिडीतीच्या बयानावरून आरोपी ईश्वर कवडु आस्वले यांचेवर भांदवी कलम 354, 354-अ सह कलम 8,12 बाल लैंगिक अत्याचार कायद्या अंतर्गत पोस्को अन्तर्गत गुन्हा दाखल केला.

 

मारेगाव पोलीसांनी कुठलाही विलंब न करता आरोपीला त्याच्या घरून तत्काळ अटक केली. पुढील तपास ठाणेदार जगदीश मंडलवार यांचे मार्गदर्शनात पोलिस उपनिरिक्षक अमोल चौधरी, जमादार आनंद अचलेवार करित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here