डॉ.शामाप्रसाद मुखर्जी समर्थ बूथ अभियानांतर्गत प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

0
504

डॉ.शामाप्रसाद मुखर्जी समर्थ बूथ अभियानांतर्गत प्रशिक्षण वर्गाचे आयोज

हिंगणघाट (वर्धा):- अनंता वायसे तालुका प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी हिंगणघाट, समुद्रपूर, सिंदी(रेल्वे)

विधानसभा क्षेत्रात डॉ. शामाप्रसाद मुखर्जी समर्थ बुथ अभियान अंतर्गत प्रशिक्षण वर्गाचे आयोजन स्थानिक तुळसकर सभागृहात आज दि.२५ रोजी करण्यात आले.

कार्यक्रमाचे सुरुवातीला वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रामदास तड़स यांचे शुभहस्ते दिप प्रज्वलन तसेच प्रतिमा पुजन करुन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी मंचकावर विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार समिरभाऊ कुणावार, विधान परिषद आमदार डॉ. रामदासजी आंबटकर, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.शिरीष गोडे,लोकसभा संयोजक जयंत कावळे,जिल्हा महामंत्री अविनाश देव,नगराध्यक्ष प्रेम बसंतानी,जिल्हा परिषद सभापती मृणाल माटे ,जिल्हा कोषाध्यक्ष भूपेंद्र शहाणे,प.स.उपसभापती योगेश फुसे, भाजपा सेलू तालुका अध्यक्ष श्री. अशोक कलोडे इत्यादि मान्यवर उपस्थित होते.

जिल्हा महामंत्री किशोर दिघे यांचे प्रस्ताविकानंतर

सर्व उपस्थित प्रमुख अतिथींचे स्वागत करण्यात आले.

प्रशिक्षण वर्गादरम्यान हिंगणघाट शहर, हिंगणघाट ग्रामीण, समुद्रपूर, सिंदी(र.) असा मंडळनिहाय आढावा घेण्यात आला.यावेळी येत्या १ ऑगस्ट ते १५ ऑगस्टपर्यंत बूथनिहाय रचना करण्याचे आवाहन करण्यात आले.

याप्रसंगी खासदार रामदास तडस,जिल्हाध्यक्ष डॉ.शिरीष गोडे,भूपेंद्र शहाणे,भाजयूमोचे प्रदेश सचिव अंकुश ठाकुर,जिल्हाध्यक्ष वरुण पाठक यांनी डॉ.शामाप्रसाद मुखर्जी समर्थ बूथ अभियानाची माहिती देऊन पदाधिकाऱ्यांना पक्षबांधणीचे दृष्टिने बूथनिहाय रचना करण्यास सांगितले.

कार्यक्रमा दरम्यान समुद्रपुर येथील नगरपंचायतचे माजी अध्यक्ष गजानन राऊत यांची भाजपा ओबीसी मोर्चाच्या जिल्हा महामंत्रीपदी तर भाजपा गोवारी समाज मोर्चाचे शहर अध्यक्षपदी दिनेश नेवारे यांची नियुक्ति करण्यात आली.यासोबतच भाजपा शहर नाभिक समाज मोर्चाचे अध्यक्षपदी विलास अंबरवेले यांची नियुक्ति करण्यात आली,महत्वाचे म्हणजे वंजारी समाज महिला समाज संघटनेच्या जिल्हाध्यक्षा अरुणाताई हेमके यांनी आपल्या महिला कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला.उपरोक्त पदाधिकाऱ्यांचे नियुक्तीबद्दल त्यांचे स्वागत करण्यात आले.

हिंगणघाट तालुकाध्यक्ष आकाश पोहाणे,शहर अध्यक्ष आशिष पर्बत, माजी पंचायत समिती सभापती गंगाधरराव कोल्हे, अल्पसंख्यांक मोर्चाचे बिस्मिल्लाह खान,शहर महिला मोर्चाच्या अध्यक्षा अनिता मावळे,सिंदि (रेल्वे) येथील नगराध्यक्षा सौ. बबिता ताई तुमाने, विनोद विटाळे, बाळू इंगोले, हिंगणघाट शहरातील नगरसेवक नगरसेविका हिंगणघाट, समुद्रपुर, सिंदी (रेल्वे) सर्कलमधील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सभापती , सदस्य इत्यादी मान्यवर मंडळी यांनी प्रशिक्षण वर्गास उपस्थित राहून कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच मंचसंचालन किशोर दिघे यांनी केले तर तालुकाध्यक्ष संजय डेहणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here