कटाक्ष:अमेरिकेत मॅकार्थीझम, भारतात संघीझम! जयंत माईणकर

0
339

कटाक्ष:अमेरिकेत मॅकार्थीझम, भारतात संघीझम! जयंत माईणकर

McCarthyism is the practice of making accusations of subversion or treason, especially when related to communism, without proper regard for evidence.

जोसेफ रेमंड मॅकार्थी!१९४७ ते १९५७ अशी दहा वर्षे रिपब्लिकन पक्षाचा सिनेटर राहिलेला राजकारणी! दुसऱ्या महायुद्धानंतर ह्या व्यक्तीने दहा वर्षात अमेरिकेत जो धुमाकूळ घातला त्यालाच नाव पडलं
मॅकार्थीझम! त्याच्या आडनावावरूनच त्याचा ईझम तयार झाला मॅकार्थीझम! अमेरिकेत अनेक क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती मॅकार्थीच्या आरोपांना बळी पडल्या. अनेक जण आयुष्यातून उठले. आणि सुज्ञ अमेरिकेन लोकांना त्याच्या आरोपतील फोलपणा कळला. त्याच्या पक्षातील लोकांनीही त्याला अक्षरशः वाळीत टाकले.
दुसऱ्या महायुद्धात हिटलरचा, मुसोलिनीचा पराभव करण्यासाठी सोव्हिएट युनियन, अमेरिका, इंग्लंड, फ्रांस एकत्र आले होते.पण जर्मनीचा पराभव होताच जगाच समिकरण बदललं. एका बाजूला अमेरिका, इंग्लंड, फ्रांस हे लोकशाहीवादी देश तर दुसऱ्या बाजूला कम्युनिस्ट सोव्हिएट युनियन. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि सोव्हिएट युनियनमध्ये
शीतयुद्ध सुरू झालेला होतं. दोन्ही देशांची क्षेपणास्त्रे एकमेकांच्या दिशेने रोखली गेली होती. लोकशाहीवादी देशात एखाद्या व्यक्तीला कम्युनिस्ट धार्जिणे म्हणणं म्हणजे त्या व्यक्तीला देशद्रोही समाजण्याइतप्त मानलं जाऊ लागलंआणि याच काळात म्हणजे १९४७ ते ५७ या दहा वर्षात या जोसेफ मॅकार्थी
दुसऱ्या महायुद्धानंतर आपल्या बेछूट आरोपांनी अमेरिकेतील अनेक उद्योगपती, राजकारणी, कलाकार यांना आपलं लक्ष बनविणे सुरू केले. काय होत त्याच्या आरोपांच मूळ? जोसेफ
मॅकार्थी अगदी कोणत्याही व्यक्तीला कम्युनिस्ट धार्जिणे, सोव्हिएट युनियनचे हस्तक , हेर असे वाटेल ते आरोप करायचा.दुसऱ्या महायुद्धानंतर शीतयुद्धाच्या काळात अशा बेछूट आरोपांनी जोसेफ
मॅकार्थीनी अमेरिका गाजवून सोडली होती. लोक त्याला अक्षरशः घाबरायला लागले होते. १९४७ साली
पहिल्यांदा सिनेटर म्हणून निवडून आलेल्या या कम्युनिस्ट आणि सोव्हिएट द्वेष रोमारोमात भिनलेल्या या माणसाची एवढी दहशत होती की अमेरिकेतील मोठमोठे लोक त्याला घाबरायला लागले. अनेक जण आयुष्यातून उठले अनेकांना तुरुंगात डांबण्यात आले. त्याच्या आरोपातून सरकारी कर्मचारी, लष्करी अधिकारी कोणीही सुटले नाहीत. मार्गारेट चेस स्मिथ या त्याच्याच पक्षाच्या सिनेटरने मात्र त्याला आव्हान दिले. स्मिथ स्वतः कम्युनिस्ट विरोधी असली तरीही तिला मॅकार्थीचे बेछूट आरोप करणंं पटत नव्हतं. एक
प्रकारे मॅकार्थीच्या गिलोटीन खाली कोणीही येण्याची
भिती असायची.प्रथम रिपब्लिकन पक्षाने त्याला पाठिंबा दिला कारण ते त्याचा वापर डेमोक्रॅटिक अध्यक्ष हॅरी ट्रुमन विरुद्ध करत होते.
पण १९५३ मध्ये रिपब्लिकन पक्षाचे आयसनहोवर अध्यक्ष झाले. त्याच काळात कम्युनिस्ट उत्तर कोरियाने दक्षिण कोरीया गिळंकृत केला होता त्यामुळे मॅकार्थीच्या आरोपांना झळाळी आली.
शेवटी चौकशी करण्यात आली. आणि डिसेंबर १९५४ मध्ये सीनेटने मॅकार्थीने केलेल्या बेेेपर्वा गुंडगिरी सादृृृश
आरोपांबद्दल त्याचा निषेध करणारा ठराव पारित केला.

जोसेफ गोबेल्सशी नामसाधर्म्य असणाऱ्या या जोसेफच्या आरोपात काहीही तथ्य आढळले नाही. मॅकार्थीच्या स्वतः च्या पक्षाचे रिपब्लिकन पक्षाचे सिनेटरही त्याला टाळू लागले. त्याच्या भाषणाच्या वेळी सिनेट हाउस जवळपास रिकामे दिसू लागले. ही त्याने सुरू केलेल्या मॅकार्थीझमची अखेर होती. शेवटची तीन वर्षे त्याने स्वतः ला दारूत बुडवून घेतले आणि अखेर १९५७ ला त्याचा मृत्यू झाला. मॅकार्थीने एक प्रकारे गोबेल्स नितीचाच अवलंब केला होता. गोबेल्स आपल्या कामात यशस्वी ठरला कारण त्याला हिटलरच्या रूपाने राजाश्रय मिळाला होता.
मात्र गेल्या सहा वर्षांपासून
संघ परिवार तशाच प्रकारच्या मॅकार्थीझमचा अवलंब करत केवळ आपल्या विचारसरणीला मानणाऱ्याना देशभक्त आणि आपल्या विरोधकांना देशद्रोही किंवा माओवादी म्हणत असल्याचं दिसत . आणि दुर्दैवाने त्याला राजाश्रय मिळत आहे. देशभक्तीच प्रमाणपत्र देताना भाजपच्या खासदार प्रज्ञा सिंग यांची जीभ इतकी घसरली की त्यांनी चक्क महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला देशभक्त असल्याचं प्रमाणपत्र भर लोकसभेत दिलं. भारताच्या राष्ट्रपित्याला मारणाऱ्या व्यक्तीला देशभक्त म्हणण्यापर्यंत संघ परिवाराने चालविलेल्या
मॅकार्थीझमची किंवा संघीझमची मजल गेली. तर दुसरीकडे

याच पक्षाच्या त्यावेळच्या मनुष्यबळ विकास आणि सध्याच्या टेक्सटाईल मंत्री स्मृती इराणी यांना तर चक्क अनेक बुद्धीमंतांच माहेरघर असलेल्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठात विद्यार्थ्यांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ च्या घोषणा दिल्याचा शोध किंवा जावईशोध लावला.(क्यूँ की सास भी कभी बहू थी). याच पक्षाच्या एका आमदाराने तर चक्क जेएनयु मधील विद्यार्थी किती कंडोम विकत घेताjत याचा पाढा वाचला.
मी माझ्या प्रत्येक लेखात आणि टी व्ही वरील चर्चेत संघ परिवारातील फोलपणा आणि त्यांची हिंसक वृत्ती यावर टीका करतो.त्याचे परिणाम मला सोशल मीडियावर भोगावे लागतात. भक्त मंडळींच्या दृष्टीने मी माओवादी असतो.
मॅकार्थीनेही कम्युनिस्ट लोकांना टारगेट करण्याचा आव आणला.

कार्ल मार्क्सने सांगितलेला मूळ कम्युनिझम अतिशय योग्य आहे. गरिबांना स्वस्तात आरोग्यसुविधा, आणि अन्नधान्य पुरविण्यासाठी मार्क्सने केलेल्या अनेक सूचनांचे पालन खर तर सर्व लोकशाहीवादी राष्ट्रात केल जात.

पण जेवढा मी कार्ल मार्क्सच्या तत्त्वज्ञानाला मानतो तितकाच मी कम्युनिझमच्या नावखाली केल्या जाणाऱ्या हिंसाचाराचा निषेध करतो.भारत हा एकमेव देश आहे जिथे १९५७ला पहिला कम्युनिस्ट मुख्यमंत्री निवडून आले होता. जगात सर्वत्र कम्युनिझम बंदुकीच्या गोळीतून सत्तेवर आला आहे. भारतात मात्र मतदानाद्वारे आला आहे. हे भारतात लोकशाहीचा पाया रचणाऱ्या पंडित नेहरूंच श्रेय मानलं पाहिजे.

मायबाप वाचकहो, विरोधकांच्या आई वडिलांचा, मुलांचा उद्धार करत त्यांना देशद्रोही ठरविणार्या संघाच्या मॅकार्थीझमला संपवा. संघीझम ला संपवा. नाहीतर हे लोक आपल्या ला संपवतील. तूर्तास इतकेच!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here