उस्मानाबाद येथे रमाई आवास योजनेतील लाभार्थीं (तृतीय पंथी) यांना अनुदानाचे धनादेश जिल्हाधिका-यांच्या हस्ते वाटप 

0
574

उस्मानाबाद येथे रमाई आवास योजनेतील लाभार्थीं (तृतीय पंथी) यांना अनुदानाचे धनादेश जिल्हाधिका-यांच्या हस्ते वाटप 

उस्मानाबाद :- किरण घाटे – शहरात रमाई आवास योजनेतुन अनेक लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला तर अनेक जण प्रतिक्षेत आहेत, तृतीय पंथी यांना देखिल यातुन घरकुलाचे लाभ देण्यात आले.नुकतेच जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगांवकर यांच्या हस्ते शेवटच्या हप्त्याचे धनादेश त्यांना वाटप करण्यात आले.नगर सेवक सिध्दार्थ बनसोडे यांनी इतरही अर्धवट व प्रतिक्षेत असलेल्या लाभार्थ्यांना लाभ देण्यांसाठी चर्चा केली.या वेळी प्रामुख्याने नगर सेवक सिध्दार्थ बनसोडे,समाज कल्याण अधिकारी बि. जी .अरावत,प्रकाश पवार, नगर परिषद कर्मचारी गोरोबा औचार,उल्हास झेंडे, सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे,असंघटित कामगार संघटनेचे सचीव संजय गजधने,काॅग्रेस तालुकाध्यक्ष सचीन धाकतोडे, लाभार्थी व इतर सदस्यगण उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here