म्युकर मायक्रोसीस वरील उपचारासाठी इंजेक्शन व औषधीसाठा शासनाने त्वरित उपलब्ध करून घ्यावे- माजी आमदार प्रा. राजु तिमांडे

0
534

म्युकर मायक्रोसीस वरील उपचारासाठी इंजेक्शन व औषधीसाठा शासनाने त्वरित उपलब्ध करून घ्यावे- माजी आमदार प्रा. राजु तिमांडे

हिगणघाट:- अनंता वायसे तालुका प्रतिनिधी १७ मे २०२१
म्युकर मायक्रोसीस वरील उपचाराचे इंजेक्शन शासनाने त्वरित उपलब्ध करून द्यावे अशी मागणी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री सुनील केदार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोनाच्या महामारी ने दुसऱ्या टप्प्यात थैमान घातले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे कोरोनाच्या महामारी नंतर उद्भवणारे पोस्ट कोविड म्युकर मायक्रोसिस बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
हिंगणघाट येथील शिवाजी वॉर्डतील गिरीश नागुलवार हे सावंगी रुग्णालयात भरती असून म्युकर मायक्रोसिसचा पेशंट आहे त्याला इंजेक्शन व गोळ्यांची आवश्यकता असल्याबद्दल जिल्हा प्रशासनाला कळविले परंतु इंजेक्शन कुठेही नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
म्युकर मायक्रोसिसची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे तरी सरकारने त्वरित म्युकर मायक्रोसिस वरील उपचाराचे इंजेक्शन व औषधीसाठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,उपमुख्यमंत्री अजित पवार ,पालकमंत्री सुनील केदार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here